Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. IMD विभागानुसार 15 मार्च रोजी राज्यात काही ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमान हे सामान्यपेक्षा अधिक असून काही ठिकाणी वातावरण उष्ण आणि दमट राहण्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका देखील बसण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान जाणून घेऊयात 15 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, 29 वर्षांपूर्वीचा त्रास उद्भवल्याने शस्त्रक्रिया
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने तापमानाचा अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. किनारपट्टीवर आर्द्रता जास्त राहील, ज्यामुळे उष्ण-दमट हवामान राहील.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. याचा विपरीत परिणाम हा पिकांवर होऊ शकतो.
मराठवाडा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान विभागाचा अंदाज राहील. बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या विभागांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, चिमुरडीचे इवले हात लिफ्टच्या दारात अडकले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद
विदर्भ
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक जाणवेल. तसेच अमरावती आणि अकोल्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











