मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..' दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या; 50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा

मुंबई तक

• 10:58 AM • 14 Mar 2026

Mumbai Crime : मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. मासे खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. अफसर (35) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्याच दोन मित्रांनी ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

Mumbai Crime

Mumbai Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..'

point

दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या

point

50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा

Mumbai Crime : मुंबईतील गोरेगावमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. मासे खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. अफसर (35) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्याच दोन मित्रांनी ही हत्या केल्याचे समोर आले आहे. 23 फेब्रुवारीच्या सकाळी अफसर त्याचा मित्र सुरेश आणि राजेश ऊर्फ नेपाली यांच्यासोबत मासे घेऊन आला होता. मासे शिजवत असताना तिघांनीही मद्यपान केले. मात्र, दारुच्या अतिसेवनामुळे अफसर तिथेच झोपी गेला आणि याच दरम्यान कढईत ठेवलेले मासे उंदरांनी खाऊन फस्त केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश

मासे एकट्यानेच खाल्ल्याचा संशय

काही वेळाने सुरेश आणि राजेश जेवण्यासाठी उठले असता त्यांना कढई रिकामी दिसली. अफसरने एकट्यानेच सर्व मासे खाऊन टाकले असावेत, असा संशय या दोघांना आला. याच रागाच्या भरात दोघांनी आधी अफसरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. या भीषण कृत्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट हरियाणाला पळून गेले. या प्रकरणातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृतदेह आणि आरोपींकडे कोणताही मोबाईल फोन किंवा ओळखपत्र नव्हते, ज्यामुळे पोलिसांना तपासात सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

50 कचरा वेचकांची चौकशी

वनराई पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी परिसरातील सुमारे 50 कचरा वेचकांची कसून चौकशी केली आणि मृतदेहाचा फोटो दाखवून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि आरोपींच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाली. तांत्रिक तपासाअभावी केवळ  गुप्तचरांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि अखेर हरियाणाच्या कैथल येथून सुरेश आणि राजेश या दोघांनाही अटक करण्यात यश मिळवले.

हे ही वाचा : सूर्याचा मीन राशीत प्रवेश, तयार होणार दोन प्रभावी योग; 15 मार्चपासून 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार उलटफेर

राजेश उर्फ नेपाली हा सराईत गुन्हेगार

तपासादरम्यान असेही समोर आले की, आरोपी राजेश ऊर्फ नेपाली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. केवळ संशय आणि नशेच्या आहारी गेल्यामुळे एका साध्या गोष्टीवरून माणसाचा जीव कसा घेतला जाऊ शकतो, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. उंदरांनी खाल्लेल्या माशांमुळे मित्राचा नाहक बळी गेला असून, सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत.