बेलापूर परिसरात तरुणाने 35 वर्षीय महिलेला उडवलं, नंतर सहा वाहने चिरडली

Navi Mumbai accident : नवी मुंबईतील बेलापूर परिसर सेक्टर 8 परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने पदपथावरून चालणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला धडक दिली आणि नंतर इतर सहा वाहनांना चिरडलं. या अपघातात सहा वाहनांचे देखील नुकसान झाले, महिलेची प्रकृती गंभीर असून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

मुंबई तक

• 06:19 PM • 14 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमध्ये अपघात

point

वाहनचालकाचे नियंत्रण सुटून 35 वर्षीय महिलेला कार चालकाने उडवले

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील बेलापूर परिसर सेक्टर 8 परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने पदपथावरून चालणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला धडक दिली आणि नंतर इतर सहा वाहनांना चिरडलं. या अपघातात सहा वाहनांचे देखील नुकसान झाले, महिलेची प्रकृती गंभीर असून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनचालकासह गाडीचा चालक आणि त्याचा मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनचा थरार सीसीटीव्हीचा फुटेजमध्ये कैद करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : परळीत 16 वर्षीय मुलीला गोड बोलून बंद दाराआड नको तेच... कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमध्ये अपघात

घटनेचा थरार हा नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर 8 मधील 'अरेंजर कॉर्नर' परिसरात घडला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. स्कॉर्पिओ वाहन चालवताना एका 19 वर्षीय तरुणाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. स्कॉर्पिओने पदपथावरून जाणाऱ्या महिलेचा जोराची धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. तसेच या धडकेत एका दुचाकीला, एका रिक्षासह सहा वाहनांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचं नाव मोहिनी शिंदे सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितलं की, गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास, रामाबाई आंबेडकरनगर येथील रहिवासी विक्रम गंगाधर कांबळे आणि मित्र आकाश हे स्कॉर्पिओ घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. या प्रकरणात वाहनचालक विक्रम कांबळे (वय 19) हा वाहन चालवत होता. 

वाहनचालकाचे नियंत्रण सुटून 35 वर्षीय महिलेला कार चालकाने धडक दिली

सेक्टर 8 परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने पदपथावरून चालणाऱ्या मोहिनी शिंदे (वय 35) यांना धडक दिली. या धडकेत महिला काही अंतर हवेत फेकली गेली, नंतर ती एका सहा गाड्यावर जावून आदळली होती, या अपघातात तिच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली, तसेच तिच्या पायांना देखील दुखापत झाली. 

हे ही वाचा : अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, हाणामारीत लेकीला वाचवण्यास गेलेल्या आईची हत्या

पीडितेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दरम्यान महिला ही गंभीर जखमी आहे. पोलिसांनी वाहनचालक आकाश कांबळे आणि विक्रम कांबळे यांना ताब्यात घेत ताब्यात घेतलं आहे. सांगण्यात येतंय की, विक्रम वाहन चालवणे शिकत असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही.

    follow whatsapp