Maharashtra Weather : कुठे वारा, तर कुठे उष्णतेची लाट; IMD चा अंदाज

मुंबई तक

• 05:00 AM • 15 Oct 2026

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा अधिक प्रभाव जाणवत आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather (AI Photo)

Maharashtra Weather (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा अधिक प्रभाव

point

अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा अधिक प्रभाव जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने 15 ऑक्टोबरसाठी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: 'संपूर्ण पगार नवऱ्याला दे, फ्लॅट नावावर कर..', IT इंजिनिअर महिलेनं संपवलं जीवन

कोकण 

पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह दुपारी किंवा सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या सर्वच ठिकाणी यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 15 रोजी पावसाची अधिकची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांसह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या सर्वच ठिकाणी यलो अलर्टचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी बहुतांश ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविलेला आहे, तर धाराशिव जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : वाशिम: दोन मोटरसायकलींची भीषण धडक, 3 जणांचा मृत्यू; 2 मुख्याध्यापकांचा समावेश

विदर्भ 

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही विशेष अधिकार दिलेला नाही.