वाशिम: दोन मोटरसायकलींची भीषण धडक, 3 जणांचा मृत्यू; 2 मुख्याध्यापकांचा समावेश

मुंबई तक

14 Oct 2026 (अपडेटेड: 14 Oct 2026, 07:12 PM)

Washim News : वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मालेगाव महामार्गावरील असणाऱ्या तपोवन फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेतच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.

Washim news (AI Photo)

Washim news (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

समोरून येणाऱ्या दुचाकीची जबर धडक

point

वाशिम जिल्ह्यात दोन मुख्याध्याकांचा दुर्दैवी मृत्यू

Washim News : जका खान - वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मालेगाव महामार्गावरील असणाऱ्या तपोवन फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेतच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन मुख्याध्यापक शाळेतून वाशिमकडे जात होते. अशा परिस्थितीत समोरून येणाऱ्या पल्सर दुचाकी वाहनाने त्याना धडक दिली. ज्यात शिक्षकांचा त्यांना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: 'संपूर्ण पगार नवऱ्याला दे, फ्लॅट नावावर कर..', IT इंजिनिअर महिलेनं संपवलं जीवन

दोन्ही मुख्याध्यापकांचा दुर्दैवी मृत्यू 

पल्सरने दिलेली धडक इतकी भीषण होती की, नगरपालिका शाळा क्रमांक 1 मुख्याध्यापक आबिद हुसैन (वय 56) आणि महापालिका शाळा नंबर 2 मुख्याध्यापक नाजिम मोहम्मदचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पल्सर चालवणाऱ्या व्यक्तीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र त्याची अद्यापही ओळख पटलेली नाही. दोन्ही वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

तिसऱ्या व्यक्तीचा वाटेतच मृत्यू 

ही धडक इतकी जोराची होती की, या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातात दुचाकीवरील असणारे व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या भीषण अपघातामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होऊन तीनवर आकडा पोहोचला. या झालेल्या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : नालासोपारा: नवजात बाळाला विकले, 17 वर्षीय आईसह डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून मंगरुळपीर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने शिक्षक आले होते. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. देशभरात अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांना काही दुचाकीस्वर किंवा इतर चालक धाब्यावर बसवतायत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.