Nanded News : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रक्कमेसाठी कर्मचाऱ्याने नांदेडमधील एमजीएम या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये स्वतःला पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुनील कुलकर्णी अस सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. यात ते 80 टक्के भाजले गेले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून वेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी जखमी व्यक्तीची पत्नी देखील उपस्थित होती. माजी मंत्र्याच्या महाविद्यालयात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये पोलिसांच्या भीतीपोटी तरुण धावू लागले, मालगाडीने दिली धडक अन् तिघांचा करुण अंत
कॅम्पसमध्येच अंगावर पेट्रोल ओतून पेटवले
नांदेड शहरात एमजीएम इंजिनियरिंग कॉलेज आहे. याठिकाणी राज्यभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. महाविद्यालयात सुनील कुलकर्णी हे शिपाई पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी अर्जित रजेची रक्कम मिळवण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडे मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने आज कुलकर्णी हे आपल्या पत्नीसह महाविद्यालयात आले होते. संबंधित विभागत त्यांनी अर्जित अर्जाच्या रकमेबाबत विचारणा केली आणि त्यानंतर त्यांनी कॉलेज कॅम्पसच्या मैदानात येऊन स्वतःवर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतले.
उपस्थितांनी विझवली आग
घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचाव करत आग विझवली. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अर्जित अर्ज, ग्रुप एलआयसीचे जवळपास 20 ते 25 लाख रुपये थकल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : आईने पाच महिन्यांच्या बाळावर फरशीने हल्ला करत डोकं फोडलं, नंतर मृतदेह स्वयंपाकघरात पुरला
कुटुंबियांचा आरोप खोटा
थकीत अर्जित अर्ज रकमेसाठी सुनील कुलकर्णी यांनी टोकाची भूमिकेनंतर महाविद्यालय प्रशासनाने खुलासा केला आहे. सुनील कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना नियमानुसार सेवानिवृत्तीची रक्कम मिळाली आहे. शिवाय एलआयसी आणि ग्रॅच्युइटी देखील मिळाली आहे. तसेच त्यांना पेन्शन देखील सुरु आहे. केवळ अर्जित अर्जाचा विषय प्रलंबित असून ते न्याय प्रविष्ठ असल्याची माहिती एमजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष कोटगीरे यांनी दिली. कुटुंबियांनी केलेला आरोप खोटा असल्याचा दावा प्राचार्य कोटगिरे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT











