Lok Sabha : महाराष्ट्रात MVA किती जागा मिळणार? पवारांनी सांगितला मोठा आकडा!
Lok Sabha Election 2024, Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभेच्या निकालाबाबात भाकित वर्तवल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024, Sharad Pawar : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडतेय. यामधील तीन टप्प्यात 24 मतदार संघात निवडणूक पार पडली आहे. तर अजून दोन टप्प्यात मतदान व्हायचे बाकी आहे.त्याआधीच अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला किती जागा मिळणार याची भाकिते वर्तवायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभेच्या निकालाबाबात भाकित वर्तवल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. (lok sabha election 2024 sharad pawar how many seat maha vikas aghadi win mahayuti)
ADVERTISEMENT
शरद पवार साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाबाबत भाकित वर्तवलं होतं. गेल्या निवडणुकीत पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. तर एमआयएमला एक जागा मिळाली होती. त्यामुळे एकूण 6 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. पण आता महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील. आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळतील असं भाकित शरद पवार यांनी केले आहे.
हे ही वाचा : Priyanka Chaturvedi : 'श्रीकांतच्या कपाळावर लिहलंय, माझा बाप गद्दार...';
राष्ट्रवादीचं काँग्रेममध्ये विलीनीकरण करणार का?
पवारांना राष्ट्रवादी काँग्रेममध्ये विलीनीकरणावर प्रश्न विचारला होता. यावर पवार म्हणाले, मी असं म्हणालो नाही. असं मी म्हणालो नाही. अशा शब्दात विलीनीकरणावर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2000 पासून एकत्र काम करत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत. मंत्री मंडळातही एकत्र होतो. मागच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले. आमची विचारधारा एकत्र आहे. एकत्रित काम करणे दोघांनाही पटल्यामुळे आम्ही काम करत आहोत, असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
पंतप्रधान मोदींनी अदाणी-अंबानीवरून काँग्रेसवर टीका केली होती.या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अदाणी-अंबानी हे आजपर्यंत कोणाचे दोस्त आहेत. याची देशात नेहमीच चर्चा होते. ज्यांच्याबद्दल चर्चा होते ते काँग्रेसवर ढकलत आहे'.
हे ही वाचा : राणांना ओवेसींचे थेट आव्हान, 'सांगा कुठे यायचंय! '15 सेकंद काय...'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT