'मी माफी मागतो...', विधानसभेत असं काय घडलं की, आव्हाडांना थेट मागावी लागली माफी? समजून घ्या क्रोनोलॉजी!

NCP (SP) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयक विधयेकावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.

ruckus in maharashtra assembly after ncp sp mla jitendra awhad controversial claims over shivaji maharaj

फोटो सौजन्य: विधानसभा

ऋत्विक भालेकर

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 07:38 PM)

follow google news

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत काल (16 मार्च) धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६ (Freedom of Religion Bill, 2026) वरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या वादग्रस्त दाव्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली. सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी तीव्र विरोध करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह तहकूब करावे लागले. 

हे वाचलं का?

आव्हाड यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला. पण त्याचवेळी त्यांनी त्यावेळी बोलताना काही वादग्रस्त विधान केलं. ज्यानंतर सत्ताधारी आघाडीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी या दाव्यांची ऐतिहासिक सत्यता आव्हाड यांच्याकडून सिद्ध करण्याची मागणी केली आणि हे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याचे म्हटले.

सभागृहात आमदार वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करू लागले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही”, “माफी मागा” अशा घोषणा देत सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. परिणामी, तालिका अध्यक्षांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

हे ही वाचा>> महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?

तहकूब नंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर आव्हाड यांनी प्रथम म्हटले की, “जर या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर मी ते मागे घेण्यास तयार आहे.” मात्र, सत्ताधारी आमदारांनी फक्त मागे घेणे पुरेसे नसून, औपचारिक माफी (formal apology) मागितली पाहिजे. जोरदार घोषणाबाजीनंतर आणि विरोधानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांना सभागृहाची माफी(express regret)मागण्याचे आदेश दिले. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अखेर सभागृहाची माफी मागितली आणि वादग्रस्त विधान पटलावरून काढून टाकण्यात आले.

विधेयकाच्या चर्चेची पार्श्वभूमी

धर्म स्वातंत्र्य विधेयक, 2026 हे विधेयक धर्मांतर रोखण्यासाठी आणि जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाईसाठी आणण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे विधेयक कोणत्याही धर्माविरुद्ध नसून, फक्त जबरदस्ती आणि फसवणुकीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी आहे. या चर्चेदरम्यान आव्हाड यांनी ऐतिहासिक उदाहरणे देत भाषण केले, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख आला आणि वाद निर्माण झाला.

सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिक्रिया

सत्ताधारी आमदारांनी आव्हाड यांच्या निलंबनाची (suspension) मागणी केली होती. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्देशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली ज्यानंतर विधानसभेचं कामकाज हे सुरळीत झाले. विरोधी पक्षाकडूनही या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असून, काहींनी विधेयकाच्या चर्चेत ऐतिहासिक संदर्भ वापरण्याचे समर्थन केले, तर काहींनी आव्हाड यांच्या वक्तव्याला अनुचित म्हटले.

हे ही वाचा>> महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

ऐतिहासिक संदर्भाचा वाद

आव्हाड यांनी आपल्या दाव्याचा आधार एका पुस्तकात असल्याचे सांगितले. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी हे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा मराठा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा असून, त्याला कोणत्याही प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भावना सभागृहात व्यक्त झाली.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी विधान पटलावरून वादग्रस्त भाग काढून टाकल्याने प्रकरण तात्पुरते शांत झाले आहे.