"ठाकरे तर अदाणींच्या नावाने शंख करत असतात ना? आणि नार्वेकर?"

Milind Narvekar on Anjali Damania : उद्योगपती गौतम अदाणी यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवरून अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

Milind Narwekar

Milind Narwekar

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 04:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"ठाकरे तर अदाणींच्या नावाने शंख करत असतात ना? आणि नार्वेकर?"

point

अंजली दमानियांचा सवाल, मिलिंद नार्वेकरांचे प्रत्युत्तर

Milind Narvekar on Anjali Damania,मुंबई : उद्योगपती गौतम अदाणी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. "Wishing Shri @gautam_adani ji a very happy birthday!" असे ट्विट करत नार्वेकर यांनी अदानी यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या पोस्टनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यावर भाष्य केले आहे. नार्वेकर यांच्या शुभेच्छांनंतर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे हा विषय अधिक चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!

मिलिंद नार्वेकरांना अंजली दमानियांचा सवाल 

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, "अरेच्चा! ठाकरे तर अडाणींच्या नावाने शंख करत असतात ना? आणि नार्वेकर? काहीच कळेनासं झालंय", असे म्हटले. ठाकरे गटाकडून अदानी समुहावर सातत्याने टीका होत असताना पक्षातील एका आमदाराने अदाणी यांना सार्वजनिकरित्या शुभेच्छा दिल्यामुळे दमानिया यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही विविध चर्चा सुरू झाल्या.

हेही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!

अंजली दमानिया यांना नार्वेकरांचे प्रत्युत्तर 

दमानिया यांच्या प्रतिक्रियेनंतर मिलिंद नार्वेकर यांनीही ट्विटरवरून तात्काळ उत्तर दिले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, " वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे आदर्श असून, जे काही करायचे ते उघडपणे करायचे हीच त्यांची आम्हाला शिकवण आहे. जय महाराष्ट्र!" नार्वेकर यांनी या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर हा वाद आणखी चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाकरे गटाने अदाणींवर कोणते आरोप केले होते? 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा अदाणी समूहावर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. मुंबईचे महत्त्व कमी करून ती गुजरातला नेण्याचा आणि मुंबईला ‘अदाणी सिटी’ बनवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अटींमध्ये फेरबदल करून तो अदाणी समूहाच्या फायद्यासाठी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईतील मिठागरांच्या जमिनी आणि इतर मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्या जात असल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला होता. मुंबईची संपत्ती मुंबईकरांच्याच ताब्यात राहिली पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी सातत्याने मांडली आहे. अशा पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी गौतम अदानी यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.