"बॉम्ब टाकेल, माझ्या नादी लागू नका, घरात घुसून मारेन", संजय दिना पाटलांची शिवसैनिकांना धमकी

Sanjay Dina Patil on shivsainik : नुकतेच फुटलेले खासदार संजय दिना पाटील यांना शिवसैनिकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. "आमच्या नादी लागाल तर घरात घुसून मारेन. सुरक्षा असेल तर बॉम्ब टाकेन", असं पाटील म्हणाले.

Sanjay Dina Patil on shivsainik

Sanjay Dina Patil on shivsainik

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 05:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"बॉम्ब टाकेल, माझ्या नादी लागू नका, घरात घुसून मारेन"

point

संजय दिना पाटलांची शिवसैनिकांना धमकी

Sanjay Dina Patil on shivsainik , मुंबई : "मला सुरक्षा सरकारने दिली आहे. मी हात जोडून विनंती केलेली आहे मला सुरक्षा नको. पोलीस असतील तर मी त्यांना कसं मारेन? पोलीस नसतील तरच मी मारु शकेन. पोलीस मला मारुन देणार नाहीत. ते त्यांना थांबवतील. मी तर वाट पाहातोय. ते लोकं यावेत आणि पोलीस माझ्यासोबत नसावेत. सुरक्षा त्यांना द्या. त्यांना दुसरं कोणी तरी मारेन आणि माझ्यावर नाव येईल. मी निष्पाप शिवसैनिकांना त्रास देऊ इच्छित नाही.  पण माझ्या कुटुंबियांबाबत, मित्रांबाबत बोलाल तर पाहा.. एकाला तर मी फार इज्जत दिली. विभागप्रमुखाची कुत्र्यासारखी परिस्थिती आहे. दादा लोकांच्या भरोसावर वाघ बनायचं सोडा. तुमच्यामध्ये किती दम आहे? हे आम्हाला माहिती आहे. आमच्या नादी लागाल तर घरात घुसून मारेन. सुरक्षा असेल तर बॉम्ब टाकेन", असं म्हणत फुटलेले खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना धमकी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'नार्वेकरांनी आशाताईंच्या नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, त्यापेक्षा हिब्रूमध्ये... राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट

आम्ही पाच लोकं मारले होते.., संजय दिना पाटील काय म्हणाले?

संजय दिना पाटील म्हणाले, त्यांना सुरक्षेची गरज आहे, मला नाही. माझ्याकडे चालत येतील, पण पायांवर परत जातील? की मान इथेच टाकून जातील? हा संजय दिना पाटील आहे. कोणी गां@@ नाही. मी पोलिसांच्या भरोशावर नाही. माझ्या कुटुंबियांना वाकड्या नजरेने जरी पाहिलं, तर घरात घुसून मारेन. कोणाचे आजोबा जिवंत असतील तर त्यांना विचारा. माझ्या वडिलांच्या वेळेस असेच आले होते. पाच लोकं मेले होते, आम्ही पाच लोकं मारले होते. तशी परिस्थिती येऊन देऊ नका. स्वत:मध्ये दम नाही. आम्हाला दादा लोकांची गरज नाही. आम्ही सगळं स्वत: करतो. 

हेही वाचा : 'संजय पाटील भो$, ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल..', चिडलेल्या राऊतांची जीभ पुन्हा घसरली

मी शिवसैनिकांना विनंती करु इच्छितो. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यामुळेच मी आज खासदार झालोय. तुमचं आणि माझं काही वाकडं नाही. मी स्वार्थासाठी पार्टी सोडलेली नाही. भडकले जाऊ नका. नाहीतर मग विमा काढून ठेवा. लाईफ इन्सुरन्स काढून ठेवा. माझ्या नादी लागले तर हॉस्पिटलमध्ये जातील किंवा स्मशानात जातील. तुम्ही आता प्रेम पाहिलंय. त्यादिवशी आले होते. तेव्हा मी आतमध्ये जेवणासाठी बोलवणार होतो. तोपर्यंत मी कोणता निर्णय घेतला नव्हता. मी वाट पाहात होतो, मातोश्रीवरुन मेसेज येईल. येऊन शिवी देऊन गेले, तरीही मी सहन केलं, असंही संजय दिना पाटील यांनी नमूद केलं. 

ठाकरेंची शिवसेना कशामुळे सोडली? संजय दिना पाटील म्हणाले... 

पुढे बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, पक्ष सोडला पण कोणावर नाराज नव्हतो. उद्धवसाहेबांवर नाराज नव्हतो ना इतर कोणत्या नेत्यावरही नाराज नव्हतो. पण एकजण होता. माझे भाऊ आहेत, त्यांच्याशी प्रॉब्लेम होता. आमच्यापैकी कोणाला गेल्या सात वर्षात पदाधिकारी देखील बनू दिलं नाही. आम्ही तिकीट मागितल्यानंतर देत नव्हते. सातत्याने अपमान करायचे. कोणाला काम मिळू देत नव्हते आणि कामही करु देत नव्हते. आम्ही वाट पाहिले. पाच वर्ष झाले, मी आता खासदार झालो. आता परिस्थिती सुधारेल. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे विचार केला, यांना हात जोडलेलं बरं आहे. मी शिवसेनेत प्रवेश केला होता, तेव्हा उद्धवजींना सांगितलं होतं की, मला माझ्यासाठी नाही. माझ्या सहकाऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी काम करायचं आहे. मुंबईत राष्ट्रवादीचा प्रभाव नव्हता. जे जमत होतं, ते करत होतो. आमचे लोक नगरसेवक, आमदार होतील, अशी अपेक्षा होती. उद्धवजी चांगले आहेत. सर्वांनी सन्मान दिला. मात्र, गाडी कुठेतरी येऊन थांबत होती.  माझ्या मुलीने नगरसेवकपदाची उमेदवारी मागितली नव्हती. मनसेची माजी नगरसेविका ती जागा मागत होती. शिवसेनेलाच मिळायला हवी होती. मनसे त्यांच्या मागे लागली होती. मी माझ्यासोबतच्या लोकांना उमेदवारी मागितली होती.