'संजय पाटील भो$&#, ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल..', चिडलेल्या राऊतांची जीभ पुन्हा घसरली

शिवसेना (शिंदे गट) पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटलांवर जहरी टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. पाहा राऊत नेमकं काय म्हणाले.

shiv sena ubt leader sanjay raut launched a scathing attack on mp sanjay dina patil expressing his rage through verbal abuse

संजय राऊतांची जीभ घसरली

मुंबई तक

• 02:41 PM • 23 Jun 2026

follow google news

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फुटीर खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरत शिवीगाळ देखील केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हे वाचलं का?

"मुलीच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली"

संजय राऊत यांनी दावा केला की, मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतःच्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी संजय दिना पाटील यांनी प्रचंड आग्रह धरला होता. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेबाबत मनसेच्या उमेदवाराच्या नावाचाही विचार सुरू होता. मात्र, मुलीला उमेदवारी न मिळाल्यास राजीनामा देण्याची भूमिका संजय दिना पाटील यांनी घेतली होती.

हे ही वाचा>> 'तीनच आमदार गायब आहेत का?', ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली

राऊत यांनी असेही म्हटले की, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही कार्यकर्ते काम करत नसल्याचं सांगत अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली होती आणि या सर्व घडामोडी माध्यमांमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता त्या घटनांबाबत वेगळे दावे करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

"शिंदे गटात गेल्यावर खोटं बोलायची सवय लागली"

टीकेची धार आणखी तीव्र करत राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना खोटे बोलण्याची सवय लागल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी उपरोधिक आणि वादग्रस्त शब्दप्रयोगांचा वापर करत पाटलांवर निशाणा साधला.

संजय राऊतांकडून संजय पाटलांना शिवीगाळ

दरम्यान, याचवेळी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या 'माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये जाल...' या विधानाबाबत संजय राऊतांकडे प्रतिक्रिया मागितली. ज्यानंतर संजय राऊत हे प्रचंड चिडले आणि अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे ही वाचा>> दाढी खाजवून आदित्य ठाकरेंनी खिजवलेलं, 24 तासाच्या आतच एकनाथ शिंदेंनी फिरवला गेम! वाचा Inside Story

'मी लागतो नादाला चल.. चल मी तुझ्या नादाला लागतो.. या बंदूक वैगरे आहेत ना आम्हाला दाखवू संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी भो$ चल.. शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला.. मी कधी या भाषेचा वापर करत नाही..'

'बंदूक काय दाखवतो $# तू मला.. शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही.. गद्दारी केलीए ना, 50 कोटी गिळले ना.. मग गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची.. ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी, बंदूक काय दाखवतोय आम्हाला.'

'सिक्युरिटी काढून ये.. ती तुला झेड प्लस काय दिलीए ना.. चल आता बघतोय मी. हे काय आम्हाला बंदूक दाखवताय %$.. काय कायदा-सुव्यवस्था आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शाहांच्या जीवावर दादागिरी करू नका.. गुजरात्यांच्या.. ' अशा शब्दात राऊतांनी संजय पाटलांवर टीका केली.

फडणवीस आणि अमित शाह यांचाही उल्लेख

यावेळी राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या नावाचाही उल्लेख करत काही नेते त्यांच्या पाठबळावर दादागिरी करत असल्याचा आरोप केला.

राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला त्यांनी संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर राजकीय आरोप केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला टीकेदरम्यान वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळेही नव्या वादाला सुरुवात होऊ शकते.

दरम्यान, राऊत यांच्या आरोपांवर आणि वक्तव्यांवर संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.