उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, पण 3 आमदारांची दांडी; कोण-कोण राहिलं गैरहजर?

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 04:46 PM)

Thackeray Group MLA Meeting : खासदार फुटल्यानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित होते. 17 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली.

Thackeray Group MLA Meeting Thackeray Group MLA Meeting

Thackeray Group MLA Meeting Thackeray Group MLA Meeting

Google CTA

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, पण 3 आमदारांची दांडी

point

कोण-कोण राहिलं गैरहजर?

Thackeray Group MLA Meeting : पक्षातले 6 खासदार फुटल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ते फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. शिवाय आज त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या 20 आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला 3 आमदार उपस्थित राहिलेले नाहीत. 17 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली आहे. खासदार फुटल्यानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?

बैठकीला हजर असलेले आमदार

1. बाळा नर
2. नितीन देशमुख
3. सुनील राऊत
4. अजय चौधरी
5. प्रवीण स्वामी
6. गजानन लवटे
7. हारून खान
8. भास्कर जाधव
9. वरुण सरदेसाई
10. सुनील प्रभू
11. कैलास पाटील
12. आदित्य ठाकरे
13.बाबाजी काळे
14. मनोज जामसुतकर
15. सिद्धार्थ खरात
16. दिलीप सोपल
17. महेश सावंत

हेही वाचा : ..अन्यथा 5 जुलै पासून उपोषण, आण्णा हजारेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

गैरहजर असलेले आमदार

18. संजय देरकर
19. राहुल पाटील
20. संजय पोतनीस

फुटलेल्या खासदारांची यादी

ओमराजे निंबाळकर 
नागेश पाटील आष्टीकर
संजय जाधव 
संजय देशमुख 
भाऊसाहेब वाकचौरे
संजय दिना पाटील 
 
विशेष म्हणजे खासदार फुटण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काही खासदार उपस्थित राहिले होते. तर काहींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती. शिवाय,  या बैठकीत अनेक खासदारांनी सोबत राहाण्याच्या शपथा देखील घेतल्या होत्या. मात्र, तरीही खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. आता हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पक्ष पुन्हा एकदा तळागाळापासून मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. ज्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन आता ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 26 जून ते 29 जून या कालावधीत उद्धव ठाकरे या मतदारसंघांचा दौरा करणार असून, कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात उद्या, 26 जून रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप आणि घाटकोपर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी होणार आहे, जिथून ते बंडखोर खासदारांना थेट आव्हान देण्याची शक्यता आहे.