CJP Press Conference : दिल्लीत सीजेपीने (CJP Press Conference) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाला. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. यावेळी काहीजणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या प्रकारावर संताप व्यक्त करत अभिजित दिपके यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. या पत्रकार परिषदेत नेहा बोरा, अभिजित दिपके, प्रशांत भूषण आणि अभिनेते प्रकाश राज उपस्थित होते.
ADVERTISEMENT
'बंद करो, बंद करो; दफा हो जाओ'
नेहा बोरा बोलत असताना काही जणांनी अचानक 'बंद करो, बंद करो' आणि 'दफा हो जाओ' अशा घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी दिपकेंनी गोंधळ घालणाऱ्यांना पन्नास-शंभर रुपये देऊन बाहेर काढावे असा घणाघात केला. यावेळी बोलताना अभिजित दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ज्ञानेश कुमार कोणाचेही ऐकत नसून ते केवळ आपल्या राजकीय मालकांचे ऐकत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ज्ञानेश कुमारांसाठी रेल्वे आणि दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागातून सुरक्षा दल बोलावण्यात आले. नरेंद्र मोदींना ज्ञानेश कुमार असे काय देत आहेत, ज्यामुळे मोदी संपूर्ण दिल्ली ठप्प करायला तयार झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : राहुल गांधींच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, आंदोलनातील वर्तनावर कोर्टाचे गंभीर सवाल!
ज्ञानेश कुमारांसाठी हे का केले जात आहे?
दिपकेंनी पुढे बोलताना सांगितले की, जंतर-मंतरवर आशुतोष आणि सौरव तिरंगा फडकवण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली. दिल्लीला येणाऱ्या रेल्वे आणि मेट्रो रोखून राजधानीची अवस्था भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरसारखी बनवण्यात आली. सर्व सुरक्षा दलांना दिल्लीत बोलावून विद्यार्थ्यांना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि माजी मुख्यमंत्र्यांना रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले. एका ज्ञानेश कुमारसाठी हे सर्व का केले जात आहे आणि ते नरेंद्र मोदींसाठी इतके महत्त्वाचे का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब
दिपकेंचा मोठा दावा
ज्ञानेश कुमार नरेंद्र मोदींना निवडणुका जिंकून देतात म्हणूनच मोदी त्यांचे संरक्षण करत आहेत, असा दावा दिपकेंनी केला. जर ते निवडणुका जिंकवून देत नसते, तर नरेंद्र मोदींनी त्यांचे संरक्षण का केले असते, असा थेट सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला. लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या संपूर्ण घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ADVERTISEMENT












