"ओमराजे रिलस्टार नाही, तर...", एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 06:57 PM)

Eknath Shinde : आज 22 जून 2026 रोजी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचलं, तसेच फुटलेल्या खासदारांसह ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक देखील केलं, नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे.

Eknath Shinde

Eknath Shinde

Google CTA

बातम्या हायलाइट

point

खासदारांबाबत एकनाथ शिंदे यांनी तोंडभरून केलं कौतुक 

point

''चार वर्षापूर्वी शिवसेनेनं उठाव केला''

Eknath Shinde : ''ओमराजे तर मनाचे राजे आहेत, त्यांनी मनाचा निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मतदारसंघात विकास झाला पाहिजे, हे सर्व ऐकून घेतलं पाहिजे. काही लोकांना ओमराजेंना रिलस्टार म्हणून हिणवलं, पण मी म्हणतो की ते रियल स्टार आहेत," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी 22 जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेत ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच त्यांच्यासह इतर खासदारांचं देखील कौतुक केलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा : द्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, पण 3 आमदारांची दांडी; कोण-कोण राहिलं गैरहजर?

''चार वर्षापूर्वी शिवसेनेनं उठाव केला''

"चार वर्षापूर्वी म्हणजे 22 जून 2022 रोजी शिवसेनेनं उठाव केला होता. 40 आमदार सुरूवातीला होते, त्यानंतर आता चौकार नाही, षटकार लगावलेला आहे. अगोदर 2022 मध्ये शिवसेना पक्ष, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता, त्यानंतर हा लढा केला. बाळासाहेबांचा विचार जपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आज बाळासाहेब यांच्या खऱ्या शिवसेनेत खासदारांनी प्रवेश केला आहे. 

फुटलेल्या खासदारांसह ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक

संजय दीना पाटील यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "संजय दीना पाटील हे बिंधास्त आणि बेधड असून दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. प्रत्येक जणांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर मनाचे राजे आहेत, त्यांनी मनाचा निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मतदारसंघात विकास झाला पाहिजे, हे सर्व ऐकून घेतलं पाहिजे. काही लोकांना ओमराजेंना रिलस्टार म्हणून हिणवलं, पण मी म्हणतो की ते रियल स्टार आहेत," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक केलं.  

हे ही वाचा : 'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?

यावेळी पुढे बोलताना त्यांनी संबोधित करत सांगितलं की, "हा पक्ष कोणत्याही मालकाचा नाही. या पक्षात काम करणारे सर्व कार्यकर्तेच म्हणून काम करू. सर्व एक कुटुंब म्हणून राहू. हे सरकार विकासाचं सरकार आहे, आपण विकासासाठी आलेला आहात, त्यामुळे तुम्ही विश्वासपूर्ण इथं आलात, पण तुमच्या विश्वासाला एकनाथ शिंदे कदापी तडा जाऊ देणार नाही", असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.