'तीनच आमदार गायब आहेत का?', ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 01:57 PM)

Eknath Shinde on Uddhav Thackeray Shivsena MLA : खासदार फुटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला तीन आमदार उपस्थित नव्हते. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीये.

Eknath Shinde on Uddhav Thackeray Shivsena MLA

Eknath Shinde on Uddhav Thackeray Shivsena MLA

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तीनच आमदार गायब आहेत का?'

point

ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली

Eknath Shinde on Uddhav Thackeray Shivsena MLA, मुंबई :  सहा खासदार फुटल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. शिवाय ठाकरेंनी सोमवारी (दि.23) आपल्या 20 आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता ठाकरेंचे आमदार फुटणार का? असा सवाल उपस्थित होत होता. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले? जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

हेही वाचा : Astrology : निर्जला एकादशीला नव पंचम राजयोगाची निर्मिती, 'या' राशींचे उजळेल भाग्य

ठाकरेंच्या आमदारांबाबत शिंदेंची प्रतिक्रिया 

पत्रकारींनी ठाकरेंचे तीन आमदार बैठकीला उपस्थित नव्हते, अशी माहिती दिल्यानंतर एकनाथ शिंदे खळखळून हसलेले पाहायला मिळाले. फक्त तीनच गायब आहेत ना? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

हेही वाचा : Inside Story : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?

शिंदेंकडून फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव 

एकनाथ शिंदे म्हणाले, कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत आणि संसदीय चौकटीत आम्ही ही प्रकिया केलेली आहे. उठाव 2022 साली झाला होता. हा दुसरा उठाव आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेले आहे. अजून काय पाहिजे? सहाच्या सहा खासदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीला उभे राहतील. धनुष्याबाण चिन्हावर निवडणूक लढवतील आणि ते निवडून देखील येतील. हे खासदार शिवसेनेमध्ये सामील झाले आहेत. स्वखुशीने ते सहभागी झाले आहेत. शिवसेना कुटुंब आहे. खऱ्या शिवसेनेच्या परिवारामध्ये आज हे खासदार सहभागी झाले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. चार वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार आमच्यासोबत होते. पुन्हा चौकार नाही तर आता षटकार मारलेला आहे. 2022 साली शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. हे विचार जपण्याचा आहे. म्हणून आज हे सहा खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. 

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, काही लोकं मीडियावर काही उलट-सुलट आरोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, हे 6 खासदार हे ग्रासरुटला काम करणारे आहेत. संजय जाधव यांना प्रेमाने तिकडं बॉस म्हणतात. कार्यकर्त्यांची नाळ जपणारा हा खासदार आहे. संजय दिना पाटील हा बिंधास्त आणि बेधडक आहे. दोस्ती-यारीसाठी उत्तम आहे. संजय पाटील हा खरा दीनांचा कैवारी आहे. प्रत्येक जणांमध्ये वेगळे गुण आहेत. ओमराजे तर मनाचे राजे आहेत, अशा शब्दात शिदेंनी खासदारांवर कौतुकाचा वर्षाव केला.