Omraje nimbalkar : ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडताना सर्व खासदारांनी विकासासाठी निधी मिळत नसल्याची खदखद बोलून दाखवली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तर शेतकऱ्याचा साधा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायचा असेल तर निधी नाही, असं म्हटलं होतं. यानंतर, केंद्र सरकारने कोणत्या खासदाराला किती निधी मंजूर केला? याबाबतची आकडेवारी मुंबई Tak ने समोर आणली होती. यामधून ओमराजे निंबाळकर यांनी 18.5 कोटींपैकी सुमारे 1.97 कोटी रुपये खर्च केल्याचे आकडेवारीत दिसून आले. दरम्यान, निधीची आकडेवारी लोकांसमोर आल्यानंतर ओमराजेंनी याबाबत सविस्तर भाष्य केलंय. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
'एमपी लॅडचा निधी म्हणजे एका वार्डात एक लाख रुपये'
ओमराजे निंबाळकर म्हणाले, एमपी लॅडचा निधी म्हणजे एका वार्डात एक लाख रुपये मिळतात. 1 लाख रुपयांमध्ये कोणतं काम होतंय? सांगा ना.. सत्ताधारी पक्षाचे खासदार, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या निधीची आकडेवारी तुम्ही काढा. मग सांगा त्यांच्या बरोबरच तुम्हालाही निधी मिळतोय. कोणत्याही निधीचं मुल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षांची आहे? ते पाहा.. त्या मुदतीनंतर त्या खासदाराचा निधी शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे. खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात जो मला निधी मिळाला, त्यातील एक पैसाही खर्च करायचा राहिलेला नाही. तुम्ही ही माहिती एमपी लॅडवरुन काढू शकता. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या बुथची संख्या ही साधारण 2475 पर्यंत आहे. मला एका वर्षाला 5 कोटी खासदार निधी मिळतो. पाच वर्षांचा 25 कोटी झाला. 25 कोटी खासदार निधीला जर 2475 जर भागलं तर एका बुधला एक लाख रुपये अन् वर दोन-एक हजार रुपये मिळतील. 1 लाख रुपयात कोणते काम होतंय ते सांगा..
हेही वाचा : 'तीनच आमदार गायब आहेत का?', ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली
"आधीच्या खासदाराने 3 कोटी रुपये कमी खर्च केल्याने ते वाढले"
पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, शाळेचं कम्पॉउंड असेल, रस्त्याचं, समाज मंदिराचं काम असेल कोणतं काम 1 लाख रुपयांमध्ये होतंय ते सांगा. त्या कुठल्याही कामाला 7 ते 10 लाख रुपये लागतात. 2029 साली म्हणजे कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही या निधीचं मुल्यमापन करावं. तर माझा निधी शिल्लक राहिला तर मला तुम्ही बोलावं. खरं तर माझा निधी 15 कोटी दिसायला हवा. मात्र, माझ्या आधीच्या खासदाराने 3 कोटी रुपये कमी खर्च केल्याने तो आता मला दाखवण्यात आला आहे. ही सर्वसामान्य लोकांनीही समजून घेणे गरजेचे आहे.
ADVERTISEMENT











