सौरव दास अन् आशितोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, गेटवर चढून जंतर-मंतरवर आले पण...

मुंबई तक

13 Oct 2026 (अपडेटेड: 13 Oct 2026, 10:10 AM)

cjp workers detained jantar mantar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP च्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सौरव दास आणि आशितोष रांका यांना पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं.

cjp workers detained jantar mantar

cjp workers detained jantar mantar

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सौरव दास अन् आशितोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

point

गेटवर चढून जंतर-मंतरवर आले पण...

CJP workers detained jantar mantar : दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी पोहोचलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे कडेकोट बॅरिकेडिंग करण्यात आले असतानाही CJP च्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी प्रवेश केला. आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह CJP चे इतर काही आंदोलक मंगळवारी (दि.13) सकाळी जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी प्रवेशद्वारावरून उड्या मारून आत प्रवेश केल्याची माहिती आहे. मात्र, ते आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: कंपनीकडून मिळणारे शेअर्स म्हणजे मोफत संपत्ती की छुपा धोका?

अजिंक्य शिंदेंलाही अटक , अभिजीत दिपके कोणता निर्णय घेणार? 

CJP चे नेते सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. सौरव दास हे आपल्या काही सहकाऱ्यांसह जंतरमंतर येथे आले होते. आशुतोष रंका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वीही दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून सुटका झाल्यावर ते पुन्हा आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जंतरमंतर येथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, अभिजीत दिपके यांची न्यायालयातून सुटका झाल्यानंतर ते महाराष्ट्रात परतले होते. त्यांच्या आजीचे निधन झाल्याने काही विधी करण्यासाठी तो महाराष्ट्रात आले होते. त्यानंतर तो पुन्हा दिल्लीत परतणार असल्याची माहिती होती. आता सौरव दास, आशुतोष रंका, अजिंक्य शिंदे आणि इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अभिजीत दिपके पुढे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.