'अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरेंचा हात?', रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ

रोहित गोळे

• 03:49 PM • 09 Nov 2026

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून सुनील तटकरे यांच्याबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या मृत्यूच्या प्रकरणात तटकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीए.

shinde shiv sena leader ramdas kadam ncp ajit pawar party sunil tatkare ajit pawar death controversy

रामदास कदमांचं खळबळजनक विधान

Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याबाबत अत्यंत गंभीर विधान केलं आहे. अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणात सुनील तटकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

'अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का?'

रामदास कदम यांनी बोलताना सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. 'आता दादांजवळ सगळ्यात जवळ तटकरे का होता? हे माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती आहे. मी अधिक काय बोलू? आणि ताईंना पण ते कळेल हळूहळू.. ताई हुशार आहेत.. त्यांना समजेल..'

हे ही वाचा>> "राजेश खन्ना स्टाइलचे कपडे अन् अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"

'अरे बाबांनो.. तटकरे कुणाचा होणार नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो.. मी याआधी देखील बोललो आहे. हा अंतुले साहेबांचा पीए होता.. आणि अंतुले साहेबांना यानीच संपवला. जो-जो माणूस याला जवळ घेतो.. त्यालाच संपवण्याचं काम हा करतो.'

'हे तर मी आज पहिल्यांदा ऐकतोय की, त्याला स्वत:ला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं. तर अजितदादांच्या घातपातामध्ये याचा पण हात आहे की काय? असाही संशय निर्माण होतो. त्या दृष्टीने देखील तटकरेची चौकशी झाली पाहिजे.' असं खळबळजनक विधान रामदास कदमांनी केलंय.

उपमुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरूनही संशय

रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, अशी चर्चाही आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचं म्हटलं. याच मुद्द्याचा संदर्भ देत त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणात तटकरेंचा काही हात आहे का?, असा संशय व्यक्त केला. तसेच, या दिशेनेही तटकरे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

हे ही वाचा>> राजकीय मतभेद बाजूला! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, ब्रीच कँडी रुग्णालयात काय घडलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड

अजित पवार यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी केलेल्या या विधानाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. एका बाजूला अजित पवार यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या जवळच्या राजकीय सहकाऱ्यांबाबत अशा प्रकारचे आरोप झाल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.