Lok Sabha : "तू आमदार कसा होतो तेच बघतो", शरद पवारांच्या नेत्याला अजित पवारांचं चॅलेंज

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar challenge sharad pawar mla ashok pawar i wil See how you become an mla lok sabha election 2024 shivaji adhalrao patil
अजित पवारांनी अशोक पवारांना (Ashok Pawar) चँलेज दिले आहे.
social share
google news

Ajit Pawar Challenge Ashok Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद देण्याबाबत व्यक्त केलं होतं. मात्र आता अजित पवारांनी अशोक पवारांना (Ashok Pawar) चँलेज दिले आहे.  'पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो', असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. (ajit pawar challenge sharad pawar mla i wil See how you become an mla lok sabha election 2024 shivaji adhalrao patil) 

ADVERTISEMENT

शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होते आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली. बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो. असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. 

हे ही वाचा : 'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पवारांबाबत फडणवीसांचं विधान

शरद पवारांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवलय. त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत. अजित पवाराने जर ठरवलं तर एखाद्याला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देत. तुझी औकात काय आहे?असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना दम दिला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्रात MVA किती जागा मिळणार? पवारांनी सांगितला मोठा आकडा!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT