Devendra Fadnavis: 'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पवारांबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..'
'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..'
social share
google news

Lok Sabha Election 2024 Devendra fadnavis and Sharad Pawar: अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी आता चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सुरू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये अहमदनगर हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात प्रचारासाठी आलेले भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हटलं की, 'शरद पवार यांनाही असं लक्षात आलंय की, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे.' (lok sabha election 2024 pawar has also realized that it is time to close the shop talking about sharad pawar devendra fadnavis big statement)

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांनी पक्ष विलिनीकरणाबाबत जे विधान केलं होतं त्याचाच धागा पकडून देवेंद्र फडणवीसांनी 'पवार साहेबांना समजलंय दुकान बंद करण्याची वेळ झालीए.' हे वक्तव्य केलं. 

'दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पाहा फडणवीस शरद पवारांबाबत नेमकं काय म्हणाले..  

'उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एक विकासाचं काम ते दाखवू शकत नाही. निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे आता तुम्ही लक्षात घ्या. परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षात विलीन होणार आहे.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Priyanka Chaturvedi : 'श्रीकांतच्या कपाळावर लिहलंय, माझा बाप गद्दार...';

'हे मी नाही म्हटलं.. पवार साहेबांनी सांगितलं, याचा अर्थ त्यांनाही वारं लक्षात आलंय. त्यांनाही लक्षात येतंय की, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे. त्यांनाही लक्षात येतंय की, त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही. त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार.' 

'यांचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार.. हे आता स्पष्टपणे दिसतंय. यांच्या पायाखालची वाळू सरकलीय.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

2019 साली देवेंद्र फडणवीस म्हणालेले.. 'शरद पवारांचा ERA संपला'

दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुकीआधी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की, 'शरद पवारांचा ERA म्हणजेच काळ संपला आहे.' पण त्यांच्या याच विधानामुळे राज्यात शरद पवारांच्या बाजूने एक वातावरण तयार झालेलं. ज्याचा पवारांनी देखील अचूकपणे फायदा उचलला होता. त्यातच मतदानाच्या अगदी शेवटच्या क्षणी साताऱ्यातील पावसाच्या सभेने पवारांनी या सगळ्यावर कळस चढवला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> अदाणी-अंबानीवरून मोदींना पवारांनी घेरलं, 'दोस्त तुमचे अन् काँग्रेसवर...'

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दिग्गज नेते उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी पराभव केलेला तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पवारांनी राज्यात 50 हून अधिक जागा मिळवत भाजपला 105 वरच रोखलं होतं. 

ADVERTISEMENT

पक्ष विलिनीकरणाबाबत शरद पवारांचं नेमकं विधान काय? 

शरद पवार यांनी नुकतीच 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखत एक मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, "पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील."

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस आणि आमच्यात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) कोणताही फरक दिसत नाही, विचारधारेबाबत. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेतूनच येतो."

"सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय मी आताच काही सांगणार नाही. आता यावर लागलीच मी भाष्य करणार नाही. विचारधारेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही त्यांच्या जवळ आहोत. रणनीतीबद्दल किंवा पुढील वाटचालीबद्दल कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांना स्वीकारणे कठीण आहे", असे विधान शरद पवार यांनी केलं होतं. 

शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस केली होती विलीन

१९७८ साली शरद पवारांनी काँग्रेसविरोधात बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन केलं होतं. ज्याला पुलोद प्रयोग म्हटलं जातं. शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

१९८६ पर्यंत हा पक्ष अस्तित्त्वात होता. १९८६ मध्ये त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. राजीव गांधी यांनी मिळून काम करण्याचा आणि काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT