गॅस सिलिंडर चोरांचा सुळसुळाट, जालन्यात 110 सिलिंडर लंपास, नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 09:54 AM)

Jalna Gas Cylinder Theft : गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात आनंद गॅस एजन्सीच्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मोठ्या प्रमाणात सिलिंडर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 4 लाख 51 हजार 543 रुपये किंमतीचे हे गॅस सिलिंडर असल्याचे बोलले जात आहे.

Jalna Gas Cylinder Theft

Jalna Gas Cylinder Theft

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गॅस सिलिंडर चोरांचा सुळसुळाट

point

जालन्यात 110 सिलिंडरांची चोरी

point

नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण

Jalna Gas Cylinder Theft : गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात आनंद गॅस एजन्सीच्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मोठ्या प्रमाणात सिलिंडर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 4 लाख 51 हजार 543 रुपये किंमतीचे हे गॅस सिलिंडर असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?

110 गॅस सिलेंडर चोरीला

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथील उठवद शिवारातील आनंद गॅस एजन्सीचे गोदाम शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टीमुळे बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरगुती तसेच व्यावसायिक वापरातील मिळून सुमारे 110 गॅस सिलिंडर चोरून नेण्यात आले. 

चोरी झालेल्या सिलेंडर मध्ये 96 घरगुती लाल रंगाचे सिलेंडर, 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर, 5 किलोचे व्यावसायिक दोन सिलेंडर अशा एकूण 110 गॅस सिलेंडरचा समावेश आहे. 4 लाख 51 हजार 543 रुपये किंमतीचे हे गॅस सिलिंडर असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

गस्त वाढवण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीस जाण्यासाठी बराच वेळ लागला असावा, त्यामुळे रात्रीच्या गस्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा : 'मी माफी मागतो...', विधानसभेत असं काय घडलं की, आव्हाडांनी थेट मागावी लागली माफी? क्रोनोलॉजी समजून घ्या!

नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

एकीकडे गॅस टंचाईमुळे नागरिकांना सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत असताना, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आनंद गॅस एजन्सी मध्ये यापूर्वीही चोऱ्या झालेले आहेत. ऐन गॅस टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात सिलेंडरची चोरी झाल्याने या प्रकरणाचा सर्वच बाजूंनी तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.