Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजाराहून अधिक नवे रुग्ण, 170 मृत्यू

मुंबई तक

• 06:25 PM • 15 Jul 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8010 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता अधिक कायम आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही अद्यापही कमी झालेली नाही. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनासमोरील आव्हानं वाढली आहेत. त्यामुळे कोरोना नेमका कसा नियंत्रणात आणायचा हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 170 रुग्णांचा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8010 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता अधिक कायम आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही अद्यापही कमी झालेली नाही. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनासमोरील आव्हानं वाढली आहेत. त्यामुळे कोरोना नेमका कसा नियंत्रणात आणायचा हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

गेल्या 24 तासात तब्बल 170 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,26,560 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 8010 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 07 हजार 205 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात 15 जुलै रोजी 7,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 59,52,192 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.17 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 170 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,48,24,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,89,257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,81,266 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,471 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,07,205 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 10 हजार 925

  • ठाणे (Thane) – 15 हजार 653

  • पुणे (Pune) – 17 हजार 401

  • नागपूर (Nagpur) – 2 हजार 293

  • नाशिक (Nashik)- 3 हजार 500

  • कोल्हापूर (Kolhapur) – 11 हजार 264

  • अहमदनगर (Ahmednagar) – 4 हजार 319

  • सातारा (Satara) – 7 हजार 783

  • सांगली (Sangli)- 11 हजार 346

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 528

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या वर आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्ये देखील सध्या 11 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Vaccine: कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांसाठी लसीचा एक डोस पुरेसा?

मुंबईत दिवसभरात सापडले 545 रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 545 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 505 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 29 हजार 795 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के आहे. डबलिंग रेट 948 दिवसांवर गेला आहे

    follow whatsapp