लाइव्ह
Marathi News Live : तुरुंगातून बाहेर येताच सुनील केदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मुंबई तक
11 Jan 2024 (अपडेटेड: 11 Jan 2024, 05:13 PM)
Marathi News Live Update : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी आमदार अपात्रतेचा निकाल दिला आहे. या निकालात शिंदेंना दिलासा मिळाला आहे. तर ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर राज्यातील विविध ठिकाणी ठाकरे गट आक्रमक झाला असून आंदोलन करतोय. यासह राजकीय राज्यभरातील इतर घडामोडींसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:36 PM • 11 Jan 2024सुनील केदारांवर आणखीण एक गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?mumbaitak
- 02:23 PM • 11 Jan 2024विधानसभा अध्यक्षांकडून राज्यघटनेची अवहेलना, नागपूरात ठाकरे गटाची बॅनरबाजीmumbaitak
- 12:59 PM • 11 Jan 2024ठाकरेंचे आमदार अपात्रच, फडणवीसांनी सांगितलं मोठं कारण...mumbaitak
- 12:23 PM • 11 Jan 2024विधानसभा अध्यक्षांचा निकाल अनपेक्षित नव्हता - अशोक चव्हाणविद्यमान राजकीय व्यवस्था पाहता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अनपेक्षित नाही. या क्षणाला महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. ही केवळ उद्धव ठाकरेंची लढाई नाही तर हा लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे. त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. लोकशाही नक्कीच जिंकेल, अशी मला आशा आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
- 11:56 AM • 11 Jan 2024नवाब मलिक तूर्तास चिंतामुक्त! सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजुर करण्यात आला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- 11:16 AM • 11 Jan 2024हा सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय- मुख्यमंत्रीआवाज कुणाचा...शिवसेनेचा.. ही ताकद कुणाची...शिवसेनेची.. हा विजय कुणाचा...शिवसेनेचा...विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणात शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा दिलेला निकाल आणि दुसरीकडे आमच्याकडे असलेला पक्षच खरी #शिवसेना आहे यावर केलेले शिक्कामोर्तब... या निर्णयामुळे आनंदित झालेल्या असंख्य शिवसैनिकांनी काल रात्री परतल्यावर मुंबई विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. तसेच ढोल ताशांच्या गजरात, भगवे झेंडे फडकावत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.या अवघड वाटेवरून पुढे जाताना आज झालेला हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास टाकून माझ्या भूमिकेला समर्थन देणाऱ्या हजारो लाखो सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे असे मी मानतो. तसेच घराणेशाहीच्या बळावर आपण लोकांवर हवे ते लादू शकतो असा समज असलेल्या लोकांचा गैरसमज देखील या निर्णयाने कायमचा दूर केला आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र...
- 11:16 AM • 11 Jan 2024लोहशाही, भावपूर्ण श्रद्धांजली! संजय राऊतांच ट्विट चर्चेतभावपूर्ण श्रद्धांजली लोकशाही १९५० - २०२३ शोकाकुल :- महाराष्ट्र
- 11:08 AM • 11 Jan 2024भाजपचे सत्तालोलुप राजकारण - सतेज पाटीलएकतर्फी... लोकशाही संपायला सुरुवात...! महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक आमदार अपात्रता प्रकरणाचा आजचा निकाल अपेक्षित असाच आहे. भाजपचे सत्तालोलुप राजकारण यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तुमचा निकाल काहीही असू दे. खरा निकाल जनतेच्या कोर्टात लागणार आहे, हे विसरू नका, असे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले आहेत.
- 11:05 AM • 11 Jan 2024अंबादास दानवेंची CM शिंदेंवर टीकामुख्यमंत्री शिंदे यांना 2019 साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का? असा सवालही उपस्थित केला.
- 11:05 AM • 11 Jan 2024ठाकरेंच्या खोटारडेपणाचा पराभव- अतुळ भातखळकरसत्य जिंकले… निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आज शिक्कामोर्तब झालेले आहे. ठाकरे आणि त्यांच्या कंपूच्या प्रचारकी खोटारडेपणाचा आज पुन्हा पराभव झाला अशी टीका भाजप नेते अतुळ भातखळकर यांनी केली आहे. घटनेच्या चौकटीत ऐतिहासिक निकाल देताना एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष आहे. भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती योग्य आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादाने दिला आहे, असे भातखळकर म्हणाले आहेत.
- 10:53 AM • 11 Jan 2024नार्वेकरांवर केदार दिघेंचा गंभीर आरोपउद्धव साहेबांना शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार नाही असं नार्वेकर म्हणतात,पण उद्धव साहेबांनी शिंदे यांना नियुक्त केले होते ते नार्वेकरांना चालते का?AB फॉर्म उद्धव ठाकरेंनी दिला म्हणून शिंदे आमदार झाले मग उद्धव साहेब पक्षप्रमुख कसे नाही, असा सवाल केदार दिघेंनी नार्वेकरांसमोर उपस्थित केला आहे. तसेच नार्वेकरांनी दिलेला निकाल आधीच ठरला होता, असा आरोप देखील केला आहे.
- 10:53 AM • 11 Jan 2024आमदार अपात्रता निकालावरून आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचलंमुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी 25 वर्षे लुटले आणि बंगले बांधले मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, रस्त्यावरच्या डांबरात, शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यात सुध्दा कटकमिशन खाल्ले कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली शेवटी सगळ्याचा "निकाल" लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

