घरच्यांची गरीब घरात लग्न लावून दिल्यामुळे नैराश्यात आलेल्या विवाहीत तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
आश्विनी हरीदास रणमले असं या विवाहीत तरुणीचं नाव आहे. २९ डिसेंबर २०२१ मध्ये आश्विनीचा यवतमाळ जिल्ह्यातील हरिदाससोबत विवाह सोहळा संपन्न झाला. हरिदास हा नागपूर जिल्ह्यातील वाढोणा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता. २०२० मध्येच हरिदासला सरकारी नोकरी लागली होती. त्याआधी तो तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करत होता, त्यामुळे त्याला फक्त ६ हजारांचा पगार होता.
लग्नानंतर हरिदास आणि आश्विनी यांनी नागपूरच्या जलालकेडा भागात भाड्याने खोली घेतली होती. हरिदास शाळेत गेल्यानंतर आश्विनीने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान एक डायरी सापडली ज्यात आश्विनीने लिहीलेल्या मजकुरामुळे या आत्महत्येमागचं गुढ उकललं.
घरच्यांनी आपलं लग्न गरीब घरात लावून दिल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं आश्विनीने डायरीत लिहून ठेवलं होतं. आपल्या इतर मैत्रीणी गरीब असूनही त्यांची लग्वन श्रीमंत घरात आणि उच्चशिक्षीत तरुणांसोबत झाली, यामुळे आश्विनी नैराश्याचे गर्तेत गेली होती. याच नैराश्येतून आश्विनीने आपलं आयुष्य संपवलं.
अकोले : कोरोनाने मोठ्या भावाला हिरावलं, दिराने विधवा वहिनीसोबत संसार थाटून दिला आधार
ADVERTISEMENT
