MHT-CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, असे करा आपले हॉल तिकीट डाऊनलोड

मुंबई तक

• 03:16 PM • 27 Jul 2022

MHT-CET सेलने मंगळवारी सीईटीसाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केले आहे. पीसीएम ग्रुपसाठी ५ ते ११ ऑगस्टदरम्यान परिक्षा होतील तर पीसीबी ग्रूपसाठी १२ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान परिक्षेचे आयोजन केले आहे. यापूर्वी या परिक्षेसाठी करण्यात अर्जात सुधारणा करण्यासाठी २३ ते ३० जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. परिक्षेसाठी लागणारे प्रवेश पत्र […]

Mumbaitak
follow google news

MHT-CET सेलने मंगळवारी सीईटीसाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केले आहे. पीसीएम ग्रुपसाठी ५ ते ११ ऑगस्टदरम्यान परिक्षा होतील तर पीसीबी ग्रूपसाठी १२ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान परिक्षेचे आयोजन केले आहे. यापूर्वी या परिक्षेसाठी करण्यात अर्जात सुधारणा करण्यासाठी २३ ते ३० जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. परिक्षेसाठी लागणारे प्रवेश पत्र उमेदवार mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटवर लॉगीन करुन मिळवू शकता.

हे वाचलं का?

MHT-CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र सीईटी अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डचा उपयोग करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतोत. यापूर्वी सीईटीच्या परिक्षा ११ जून ते २० दरम्यान होणार होत्या. मात्र, आयआयटी आणि जेईईच्या सयुंक्त परीक्षा त्याच दरम्यान अल्याने सीईटीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर २६ जुलै रोजी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी आपले प्रवेशपत्रावरील सुचनांना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यात जर एखादी त्रुटी अढळल्यास त्वरित संबधित अधिकाऱ्याशी संपर्क करावा. जर त्यात सुधारणा करण्याची गरज असल्यास अधिकारी उमेदवाराकडून अंडरटेकिंग फॉर्म भरुन घेईल, अशी माहिती सेलकडून देण्यात आली आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी १२ आणि सीईटीत मिळालेल्या गुण समान रुपाने पाहिले जातील, अशी देखील माहिती संबधित विभागाकडून देण्यात आली आहे.

अशे असेल परिक्षेचे स्वरुप

एमएचटी-सीईटीच्या परिक्षा ऑनलाईन होतील. एमसीक्यूपद्धती प्रश्न पत्रिकेचे स्वरूप असेल. १००-१०० गुणांचे तीन पेपर असतील. तसेच सीईटी सेल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मॉक टेस्ट देखील उपलब्ध करुन देणार आहे. त्याचबरोबर परिक्षेनंतर वेबसाईटवर उत्तरसुची उपलब्ध केली जाईल. उत्तरसुचीला उमेदवार आव्हान देखील देऊ शकतो.

    follow whatsapp