छत्रपती शिवराय सूर्यासम आहेत, त्यांची तुलना कशी करणार? करुच शकतं नाही : मंगलप्रभात लोढा

मुंबई तक

• 03:54 PM • 30 Nov 2022

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. अशात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. अशात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हे वाचलं का?

मात्र छत्रपती शिवाजी महाराज सूर्यसम आहेत, आमचे दैवत आहेत. त्यांच्याशी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही! प्रतापगडावरील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला आहे, असं म्हणतं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं. तसंच मी पूर्णपणे प्रामाणिक काम करत आहे, मला काम करु द्या, अशीही विनंती त्यांनी केली.

मंगलप्रभात लोढांनी काय स्पष्टीकरण दिलं?

मी फक्त उदाहरण दिलं होतं. आज एक मोठा कार्यक्रम प्रतापगडवर आयोजित करण्यात आला होता. सगळं सरकार तिथं उपस्थित होतं. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे काही नियम, सिद्धांत होते, राज्याची कल्पना होती त्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना मी काय कोणीही करु शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण लहान मुलालाही देतो. मी देखील उदाहरण दिलं होतं. त्याशिवाय माझा दुसरा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा राजकारणाचा विषय नाही, यावरील राजकारण बंद करा.

विरोधकांना उद्देशून लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचं प्रेम होतं, तर यापूर्वी अफजलखानाची कबर काढण्यासाठी कधी कोण उभं राहिलं? का तुम्ही काढले नाही? छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत. आम्ही सर्व इथे आहोत. कशी तुलना करणार? करुच शकतं नाही. प्रतापगडावरील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला आहे. माझ्यामते देशातील, जगातील अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून या मातीत येतात.

मध्यंतरी इस्त्रायलचे पंतप्रधान इथे आले होते, तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात? त्यांनी रायगडावर जाणार असल्याचं सांगितलं. कशासाठी विचारल्यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे युद्ध कौशल्य होतं त्याचा वापर आजपर्यंत इस्त्रायल करत आहे, म्हणून मी तिथं जाणार आहे. आता ही काय तुलना होती का? हे केवळं उदाहरण होतं. मी पण उदाहरण दिलं. मी कधीही असं राजकारण करत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, मला बक्ष द्या, मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. मला काम करु द्या.

    follow whatsapp