–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
मोबाईल आणि इंटरनेटमुळे अनेक प्रश्नांची उत्तर सुटकी सरशी मिळतात. कुठली माहिती असो की उपाय, इंटरनेटच्या मदतीने मिळवतात येतात. मात्र, आरोग्यासंबंधीचे सल्ले अनेकदा जीवघेणे ठरतात. असंच काहीसं घडलंय नागपूरात. एका अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्यासाठी चक्क युट्युब व्हिडीओची मदत घेतली. युट्यूबच्या मदतीने केलेला उपायामुळे तरुणीने थोडक्यात वाचवली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
युट्यूब व्हिडीओ बघून गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचे नागपुरातीलच २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. प्रेम संबंधातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी तिने चक्क युट्यूब व्हिडीओ बघून उपाय केला.
१२ तासांत दोन हत्यांच्या घटनांनी हादरलं नागपूर शहर, पोलीस तपास सुरु
१७ वर्षाची युवती आणि २७ वर्षाचा तरुण दोघंही मूळचे गावाकडे राहणारे आहेत. दोघांमध्ये प्रेमात होते. प्रियकर हा नागपुरात एक रुग्णालयात काम करतो. तो एमआयडीसी परिसरात राहतो. दोघंही एकमेकांना भेटायचे. मुलगी सुद्धा त्याला भेटायला यायची. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून युवती गर्भवती राहिली.
यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी धोकादायक मार्ग निवडला. युवतीने युट्युबवर गर्भपात कसा करायचा याची माहिती घेतली. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे काढा बनवला आणि तो प्राशन केला.
धक्कादायक.. पुण्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा काढला काटा
काढ्याचं सेवन केल्यामुळे युवती अस्वस्थ झाली. त्यानंतर हा सगळा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला नागपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
सध्या तिची प्रकृती ठीक आहे असून, या प्रकरणात ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचं ठिकाण शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन असल्याने तो गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तक्रार आल्यानंतर २७ वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुण सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
