Sandeep Deshpande hits out sanjay Raut : पटलं तर घ्या म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (Maharashtra NavNirman Sena) संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्र लिहून मार्मिक टोले लगावले असून, ‘काही दिवसांनी रस्त्यावर पवार… पवार… असं ओरडत दगड भिरकावत फिरायची पाळी येईल’, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केलं. पटलं तर घ्या म्हणत त्यांनी राऊतांना लक्ष्य केलं आहे.
संदीप देशपांडे राऊतांना म्हणाले, “आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र! हे येडं** मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटीच हे पत्र लिहित आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे.”
Uddhav Thackeray: “…तर 2024 साली भाजपला पाणी पाजणे शक्य”, ठाकरेंचा इशारा
…ही सगळी लक्षणं तुमच्यात दिसायला लागली आहेत -संदीप देशपांडे
“आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढळू लागते. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस Attention Seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणं तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी”, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे.
Sandeep Deshpande Vs Sanjay Raut: “पत्रकार परिषदेच्या अगोदर मेडिटेशन करा, त्यामुळे…”
देशपांडे पुढे म्हणतात, “माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषदा घेता, त्याऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या. असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषदेच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटं मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल”, असा टोला संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
Thackeray कडून मशालही काढून घेण्याची तयारी, ‘या’ पक्षाची थेट शिंदेंकडे धाव
सल मनातून काढून टाका, संदीप देशपांडेंनी राऊतांना काय दिला सल्ला?
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत”, असं देशपांडेंनी पत्रात म्हटलं आहे.
Eknath Shinde शिवसेनेचे नवे ‘बॉस’; पहिल्या कार्यकारिणीमध्ये घेतले मोठे निर्णय
उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार -संदीप देशपांडे
“उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार… पवार… असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्याच व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या… नाही पटलं तर चू** आहे असं म्हणून विसरून जा!”, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT











