Mood Of The Nation : आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपसाठी धक्कादायक चित्र

मुंबई तक

• 04:12 PM • 11 Aug 2022

महाराष्ट्रात २१ जूनला राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राज्यात सुरू असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात २१ जूनला राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राज्यात सुरू असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचं उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

Mood Of The Nation : भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे का? काय सांगतो सर्व्हे?

महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गेलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे फडणवीस सरकार आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आम्हीच खरी शिवसेना हा दावा त्यांनी केला आहे. तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधिलकी असलेल्या शिवसेनेसोबत युती केली आहे असं भाजपचं म्हणणं आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही लांबला होता जो ९ ऑगस्टला पार पडला. मात्र या सगळ्याचा परिणाम आज लोकसभा निवडणुका घेतल्या गेल्या तर होईल असं लोकांना वाटतं आहे.

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात काय स्थिती असेल ? काय सांगतोय सर्व्हे?

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. असं इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेमध्ये लोकांचं म्हणणं आहे. तसंच १८ जागा या एनडीएला म्हणजेच भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळतील असं लोकांना वाटतं आहे. असं घडलं तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक आहे यात शंकाच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव २०१४ मध्ये दिसून आला होता. तसंच २०१९ मध्येही तो कायम राहिला. एनडीएचे जास्त खासदार या दोन्ही वर्षांमध्ये निवडून आले. मात्र आत्ता जे सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं आहे त्यानंतर जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक ठरेल असं लोकांचं म्हणणं आहे.

एकंदरीत सर्व्हेचा फटका बसेल तर तो शिंदे गटाला आणि भाजपला आहे. हा अत्यंत धक्कादायक सर्व्हे आहे असंच समोर येतं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले आहेत. त्याच काळात घेतलेला हा सर्व्हे आहे. भाजप आणि शिवसेना यांच्याकडे ४२ जागा होत्या. आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागांचं बळ आहे. मात्र याचं नुकसान होऊन त्या १८ वर येऊ शकतं असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो.

    follow whatsapp