काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडींना राज्यसभेची उमेदवारी, ईच्छुकांचा थेट ‘सोनियां’वरच निशाणा

मुंबई तक

• 05:28 AM • 30 May 2022

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासह नगमा यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. नगमा यांनी थेट इम्रान प्रतापगडी यांचं नाव घेतच अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. रविवारी सायंकाळी काँग्रेसची बहुप्रतिक्षित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. […]

Mumbaitak
follow google news

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासह नगमा यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. नगमा यांनी थेट इम्रान प्रतापगडी यांचं नाव घेतच अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. रविवारी सायंकाळी काँग्रेसची बहुप्रतिक्षित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांचं राज्यसभेत जाण्याचं स्वप्न भंगलं.

राज्यसभेसाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी अनेकांचा पत्ता पक्षाकडून कापण्यात आला. त्यामुळे काही जणांनी मौन धरलं, तर काहींनी त्यांची खदखद बोलून दाखवली आहे. यात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि महिला काँग्रेसच्या महासचिव अभिनेत्री नगमा यांनी नाराजी सोशल मीडियातून व्यक्त केलीये.

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून पत्ता कापण्यात आल्यानंतर अभिनेत्री नगमा यांनी म्हटलंय की, ‘२००३-०४ मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. त्यावेळी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींनी मला वचन दिलं होतं की, राज्यसभेत पाठवणार. तेव्हापासून आतापर्यंत १८ वर्ष झाली आहेत. अजूनही ती वेळ आली नाहीये. इकडे इम्रान प्रतापगडी राज्यसभेत गेले आहेत. मी यासाठी पात्र नाहीये का?’, असं नगमांनी म्हटलं आहे.

पवन खेरा काय म्हणाले?

नगमा यांच्याबरोबरच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही नाराजी बोलून दाखवलीये. राज्यसभा उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर पवन खेरांनी एक ट्विट केलंय. हे ट्विट अभिनेत्री नगमा यांनीही रिट्विट केलंय.

पवन खेरा यांनी म्हटलं आहे की, ‘कदाचित माझ्या तपर्श्चयेतच काही उणीवा राहिल्या असाव्यात.’ पवन खेरा यांच्या ट्विटवर एकाने म्हटलंय की, ‘कुटुंबाऐवजी देशासाठी जगाल, तर कधीही फसवणूक झाल्याची जाणीव होणार नाही. भूमिका बदला.’

अर्चना नौटियाल नावाच्या या यूजरला खेरा यांनी उत्तर दिलंय. ‘मी ज्या कुटुंबासोबत उभा आहे, ते कुटुंब देशासाठी जगतेय आणि देशासाठी जिव सुद्धा देऊ शकते. संघ परिवारवाल्यांना (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हे समजणार नाही,’ असं खेरा यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेसाठी इतकी स्पर्धा का निर्माण झाली?

काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच प्रचंड चर्चा होती. ईच्छुकांची भलीमोठी यादीच चर्चिली जात होती. मात्र, अनेकांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे काँग्रेसमधून राज्यसभेसाठी ईच्छुकांची इतकी संख्या का वाढली?, अशीही चर्चा केली जातेय.

राज्यसभेसाठी ईच्छुकांची संख्या वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसेंदिवस काँग्रेसचा घटत चाललेला जनाधार. त्यामुळेच राज्यसभेत जाण्यासाठी अनेकजण लॉबिंग करताना दिसले. त्यातच यादी जाहीर झाल्यानंतर नाराज काँग्रेसी नेते सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढींना उमेदवारी

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे इम्रान प्रतापगढींना महाराष्ट्रातून उमेदवारी दिलीये. इम्रान प्रतापगढी यांनी काही वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच आधीपासून काँग्रेसमध्ये असलेले नेते दुखावले गेले आहेत.

काँग्रेसने कुणा कुणाला दिलीये उमेदवारी?

काँग्रेसने दहा उमेदवारांची यादी जाहीर केलीये. यात छत्तीसगढमधून राजीव शुक्ला आणि रंजिता रंजन, हरयाणातून अजय माकन, कर्नाटकातून जयराम रमेश, मध्य प्रदेशातून विवेक तन्खा, महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी, राजस्थानातून रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी, तर तामिळनाडूतून पी. चिदंबरम यांचा समावेश आहे.

    follow whatsapp