Pathaan च्या तिकिटामुळे भामटा जाळ्यात सापडला… गर्लफ्रेंडसमोरच आवळल्या मुसक्या

मुंबई तक

31 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

Nagpur police arrested the accused from Bangalore while watching pathaan movie नागपूर : केंद्रीय कोळसा मंत्र्यांचा ओएसडी असल्याचं सांगत कोळसा व्यापाऱ्याला १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल आणि सहआरोपी पियुष पुरोहितला पोलिसांनी अटक केली. मयंकचे सहकारीही संजय बघेल आणि संजीत बघेल […]

Mumbaitak
follow google news

Nagpur police arrested the accused from Bangalore while watching pathaan movie

हे वाचलं का?

नागपूर : केंद्रीय कोळसा मंत्र्यांचा ओएसडी असल्याचं सांगत कोळसा व्यापाऱ्याला १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल आणि सहआरोपी पियुष पुरोहितला पोलिसांनी अटक केली. मयंकचे सहकारीही संजय बघेल आणि संजीत बघेल यांनाही पोलिसांनी आरोपी केलं आहे. (Nagpur police busted an inter-state racket demanding an extortion of Rs 1 crore from a coal trader claiming to be the Union Coal Minister’s OSD.)

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील पियुष हा मध्य प्रदेशमध्ये एका वेब पोर्टलचा प्रतिनिधी आहे. तर संजय बघेल आणि संजीत बघेल या वेब पोर्टलमध्ये वरिष्ठ पदावर आहेत. या तिघांनी मिळून मध्य प्रदेशमध्ये कोल वॉशरी चालविणाऱ्या नागपूरमधील कोळसा व्यापाऱ्याच्या विरोधात बातम्या चालविण्यास सुरुवात केली होती. वेगवेगळ्या विभागात ईमेल करुन माहिती मागवून संबंधित व्यापाऱ्याविरोधात बातम्या देत होते.

BJP : ‘तो’ पर्यंत सत्यजीत तांंबेंना भाजपमध्ये घेणार नाही! बावनकुळे काय म्हणाले?

बातमी चालवण्यापासून रोखण्यासाठी हे तिघेजण उद्योजकांकडे एक कोटी रुपयांची मागणी करत होते. पण उद्योजक दाद देत नसल्याचं पाहून बंगळूरुमधील एक आरोपी आणि या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल याने कोळसा मंत्र्यांचा ओएसडी असल्याचं सांगतं ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेरी या सर्वांना कंटाळून उद्योजकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

गोपीचंद पडळकर की रोहित पवार; MPSC परीक्षार्थ्यांना कोणामुळे दिलासा?

व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणातील मयंक अग्रवाल या आरोपीला नागपूर पोलिसांनी बंगळूरुमधून अटक केली. पठाण चित्रपट पाहताना त्याने पेटीएम वरुन तिकीट बुक केले होते. त्यावरून पोलिसांना त्याचा सीट नंबर मिळाला. चित्रपट पाहताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी एक मैत्रीणही त्याच्यासोबत होती. पोलिसांना याप्रकरणी तिचाही सहभाग असल्याचा संशय असून त्या दिशेने सुद्धा तपास सुरू आहे.

    follow whatsapp