कर्नाटकातील घटनेचे नवी मुंबईत उमटले पडसाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

मुंबई तक

• 08:00 AM • 19 Dec 2021

बंगळुरूतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यात घटनेचे पडसाद उमटले. रविवारी नवी मुंबई शहरातील वाशी येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय संघटना आणि मराठा संघटनांनी एक येत निषेध नोंदवला. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. वाशी येथे शिवप्रेमी संघटना, शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मराठा समाज […]

Mumbaitak
follow google news

बंगळुरूतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यात घटनेचे पडसाद उमटले. रविवारी नवी मुंबई शहरातील वाशी येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय संघटना आणि मराठा संघटनांनी एक येत निषेध नोंदवला. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.

हे वाचलं का?

वाशी येथे शिवप्रेमी संघटना, शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मराठा समाज संघटनांनी उत्स्फूर्त आंदोलन करून विटंबना करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी जोरदार घोषणा देत घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराज पुतळ्याला दुग्धाभिषेक करून करण्यात आला. कर्नाटक सरकार वारंवार मराठी द्वेष दाखवत असल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंमत असेल तर कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्या नागरिकाने महाराष्ट्रात येवून हे कृत्य करावे, त्याला इंगा दाखवू, असं आव्हान निषेध नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिलं.

‘आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी’, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना कर्नाटकातील बंगळुरु शहरात घडली. या घटनेची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर उपमुख्यमंत्री, राऊतांकडून तीव्र निषेध

बंगळुरू येथे घडलेल्या या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आल्याने मराठी भाषिक आणि शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

    follow whatsapp