Jayant Patil : ‘ज्या’ शब्दामुळे बाहेर जावं लागलं तोच शब्द पुन्हा वापरत केलं ट्विट, म्हणाले…

मुंबई तक

22 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर विधानसभेत […]

16 mlas disqualified ncp jayant patil big statement

16 mlas disqualified ncp jayant patil big statement

follow google news

नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं.

हे वाचलं का?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या मुद्द्यावर सर्व विरोधक आक्रमक झालेले असताना अध्यक्ष नार्वेकरांनी मात्र त्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका” असा शब्दप्रयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून याच निर्लज्ज शब्दावर आक्षेप घेण्यात आला.

पुन्हा तोच वापर केलं ट्विट :

मात्र निलंबन झाल्यानंतरही जयंत पाटील यांनी ट्विट करुन पुन्हा तोच शब्द वापरला आहे. जयंत पाटील म्हणाले, या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार… बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…

गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. यात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे.

दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप आणि गैरव्यवहाराबद्दल आम्ही उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा प्रयत्न होत होता.

म्हणूनच मी सदनात उभे राहून ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे शिंदे फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याच्या व वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व मला हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. राज्य सरकारच्या या हुकुमशाही कृतीचा मी निषेध करतो. राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार. बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज की जय!

    follow whatsapp