भारतात ईडीची नोटीस येणं फॅशन झालीये; सुप्रिया सुळेंचा मार्मिक टोला

मुंबई तक

• 03:16 AM • 26 Sep 2021

राज्यात ईडीची नोटीस आणि सीबीआयची कारवाई हे दोन्ही मुद्दे सातत्यानं चर्चेत असून, राज्यातील सत्ताधारी व विरोधक यावरून अनेकदा आमने-सामने येताना दिसत आहे. ईडीच्या नोटिसावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र व भाजपवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे शनिवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला […]

Mumbaitak
follow google news

राज्यात ईडीची नोटीस आणि सीबीआयची कारवाई हे दोन्ही मुद्दे सातत्यानं चर्चेत असून, राज्यातील सत्ताधारी व विरोधक यावरून अनेकदा आमने-सामने येताना दिसत आहे. ईडीच्या नोटिसावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र व भाजपवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे शनिवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही भारतामध्ये आता फॅशन झाली आहे. ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात, त्याचप्रकारे आता ईडीतून नोटिसा यायाला लागण्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे स्मारक हे राज्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचं वैभव आहे. त्याचं जतन होणं गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूचे जतन करण्यासाठी योग्य ती पावलं उचलायला पाहिजे. तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत’, असंही त्या म्हणाल्या.

मुलगी रेवतीने दिलेल्या खास गिफ्टबाबत सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाल्या..

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपतील नेते महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून सातत्याने टीका करत असतात. विरोधकांकडून सतत होणाऱ्या टीकेबद्दलही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलं. ‘आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावं. आमची महाविकास आघाडी मात्र जनतेची सेवा करत राहिल’, असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Uddhav thackeray-फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा, सुप्रिया सुळे म्हणतात…

बसच्या तिकीटासोबत केली होती तुलना

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या नोटिशीची बसच्या तिकीटासोबतही तुलना केली होती. ‘मी माझ्या आयुष्यात सत्तेचा असा गैरवापर, दबावतंत्र कधीच पाहिलेलं नाही. जसं बस तिकीट आपण वाटतो तसं विरोधक बोलले की पाठवली ईडीची (ED) नोटीस अशी परिस्थिती या देशात झालेली आहे; हे दुर्दैव आहे. भारताच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी हे योग्य नाही. यांनी जणू हे नवीन कल्चरच (राजकीय संस्कृती) काढलेली आहे. ‘लेकिन हम भी लढ लेंगे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

    follow whatsapp