Baramati: 'अजितदादांची पत्नी सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच स्वीकारणार नाही', श्रीनिवास पवारांचं मोठं विधान

साहिल जोशी

29 Apr 2024 (अपडेटेड: 29 Apr 2024, 07:59 PM)

Shrinivas Pawar: अजित पवारांची पत्नी सुप्रिया विरोधात निवडणुकीला उभी राहते हे कधीही स्वीकारणार नाही. असं विधान अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी केली आहे.

'अजितदादांची पत्नी सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच स्वीकारणार नाही'

'अजितदादांची पत्नी सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच स्वीकारणार नाही'

follow google news

Ajit Pawar vs Shrinivas Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये सर्वांचं लक्ष हे बारामतीच्या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. कारण बारामतीत पहिल्यांदाच पवार वि. पवार अशी लढाई आहे. अशातच अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी India Today सोबत बोलताना एक मोठं विधान केलं आहे. 'अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया विरोधात उभ्या राहतात हे कधीही स्वीकारलंच जाऊ शकत नाही..' असं श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले. (it will never be accepted that ajitdada wife sunetra pawar contesting against supriya shrinivas pawar big statement)

हे वाचलं का?

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तेत सामील व्हायचा निर्णय घेतला. पण याच निर्णयामुळे पवार कुटुंबात फूट पडली. अजित पवार हे केवळ भाजपसोबतच गेले नाही तर आपल्या बहिणीच्या विरोधात स्वत:च्या पत्नीलाचा म्हणजे सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. हीच बाब अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांना पटलेली नाही.. 

श्रीनिवास पवारांना अजितदादांचं 'हे' वागणं पटलं नाही, पाहा नेमकं काय म्हणाले...

प्रश्न: तुम्ही अजित पवारांचे सख्खे भाऊ आहात.. तरीही तुम्ही शरद पवारांची बाजू का निवडली?

श्रीनिवास पवार: मला वाटतं की, साहेब हे योग्य बाजूला आहेत.. आणि मी नेहमीच 'योग्य' बाजूकडे असतो. 

प्रश्न: अजित पवार यांनी शरद पवारांना या लढाईत पाठिंबा द्यायला हवा होता का?

श्रीनिवास पवार: होय.. वय आणि त्यांचा अनुभव पाहता मला वाटतं की, अजितदादा पवारांची काय अडचण झाली ते.. पण तरीही यांनी पवार साहेबांसोबत असायला हवं होतं. 

प्रश्न: अजित पवार दावा करतात की, त्यांचीच राष्ट्रवादी खरी आहे.. 

श्रीनिवास पवार: ही निवडणूक ठरवेल की, कोण चूक आणि कोण बरोबर.. पक्षाचे कार्यकर्ते हे म्हणजे सर्व काही नाही.. अनेक कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत आहेत कारण अजितदादा अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत. म्हणूनच आपण त्या कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणू शकतो. 

प्रश्न: 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या शपथविधीनंतर अजित पवार तीन दिवस हे तुमच्या मुंबईतील घरी राहिले होते. तेव्हा तुम्ही काय भूमिका बजावली होती.. पण आता नेमका काय फरक तुम्हाला जाणवतोय? 

श्रीनिवास पवार: हे बघा.. ते माझे मोठे भाऊ आहेत.. मी नक्कीच त्यांना पाठिंबा देतो जेव्हा ते अडचणीत असतात. पण जेव्हा त्यांची (अजित पवार) पत्नी (सुनेत्रा पवार) ही सुप्रिया विरोधात उभी राहिली.. ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. म्हणून मी आज साहेबांसोबत आहे. 

प्रश्न: सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यामुळे पवार कुटुंबात फूट पडली आहे का?

श्रीनिवास पवार: नाही.. नाही.. कुटुंब हे सोबतच आहे.. तुम्ही हे निवडणुकीनंतर नक्कीच पाहू शकता. सर्व जण हे एकत्रच राहतील. 

हे ही वाचा>> NCP: 'बारामतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघूनच घेतो..' अजितदादांचा सख्ख्या भावाला थेट इशारा?

प्रश्न: तुम्ही म्हणात आहात की, निवडणुकीनंतर तुम्ही सगळे पुन्हा एकत्र याल?

श्रीनिवास पवार: हो.. हो... कुटुंब म्हणून आम्ही नक्कीच एकत्र येऊ.. राजकीय पातळीवर नाही.. आम्ही केवळ कुटुंब म्हणूनच एकत्र येऊ..

प्रश्न: खरी राष्ट्रवादी कोणाची, बारामतीचा खरा नेता कोण? यासाठी ही सगळी लढाई सुरू आहे असं वाटतं का?

श्रीनिवास पवार: हो नक्कीच.. पण कोणतीही लढाई नाही.. खरे नेते हे फक्त पवार साहेबच आहेत... 

असं श्रीनिवास पाटील हे यावेळी म्हणाले. 

"याच्यासारखा नालायक माणूस नाही", अजितदादांवर आधीही केलेली श्रीनिवास पवारांनी टीका

"वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही", अशी थेट टीका श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.

हे ही वाचा>> बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण?

काटेवाडीतील ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणालेले की, "तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगला काळ असेल, वाईट काळ असू दे, नेहमी दादांच्या (अजित पवार)बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे." 

"साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला? ज्या साहेबांनी (शरद पवार) आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता, तर मी खुश झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवारांना संपवायचे होते. घरातील व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो." अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली होती. 

    follow whatsapp