NCP: 'बारामतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघूनच घेतो..' अजितदादांचा सख्ख्या भावाला थेट इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवारांनी सख्ख्या भावाला दिला इशारा...
अजित पवारांनी सख्ख्या भावाला दिला इशारा...
social share
google news

Ajit Pawar Shirur Speech: स्मिता शिंदे, शिरूर: लोकसभा निवडणूक 2024 ची महाराष्ट्रातील लढाई ही अत्यंत रंजक होत चालली आहे. त्यातही महायुतीमध्ये जागांवरून बरीच चढाओढ सुरू आहेत. अशाीवेळी प्रचंड चर्चेत असलेल्या शिरूर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज (26 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. याच पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी भाषण करताना मात्र आपल्या सख्ख्या भावालाच थेट इशारा दिला आहे. (lok sabha election 2024 talking about baramati elections ncp chief ajit pawar gave a direct warning to brother shrinivas pawar)

'शिवाजी आढळराव पाटलांना आपल्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे. गेल्या लोकसभेत तुम्ही माझ्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांना निवडून दिलं आहे. पण ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. आता माझ्या भागात काही जणांनी भावकीची निवडणूक केली आहे. ते मी बघतो काय करायचं ते..' असं म्हणत अजित पवार यांनी त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांना उघडउघड इशारा दिला आहे. 

आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवार आक्रमक, पाहा काय म्हणाले...

'माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवाजीरावांची तीन टर्मची.. अक्षरश: त्या बाबाला पराभूत करण्यासाठी आमच्या तोंडाला फेस आला.. परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही. परंतु आता आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vijay Shivtare: 'हा नालायक, उर्मट... त्यांचा भाऊही म्हणाला..' अजित पवारांवर शिवतारेंची जहरी टीका

'आता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितलं म्हणून निवडून दिलं त्यांची पाच वर्षांची कारकीर्द पाहा.. इतकं सांगितलं.. नका देऊ राजीनामा.. नका देऊ.. लोकांना नाही आवडत.. लोकं विचारपूर्वक मतदान करत असतात. हे मतदान खऱ्या अर्थाने पाहिलं तर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे.'

'मित्रांनो, ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही.. काही जणांनी ती भावकीची केलीए माझ्या भागात.. ते मी बघतो काय करायचं ते. पण गावकीची देखील नाही आणि भावकीची पण नाही..'

'खासदारकीला एक, आमदारकिला एक यापुढं असं अजिबात चालणार नाही. दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे. प्रत्येकानं आपापला गाव बघा.. आधी तर भावकी सोबत आहे का, हे पण बघा.. अरे बाबा मला भावकीच माहितेय.' असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे.

ADVERTISEMENT

मावळ लोकसभा शिंदेंच्या शिवसेनेला जाणार, अजित पवारांकडून घोषणा...

दरम्यान, मावळ लोकसभा ही शिंदेच्या शिवसेनेला जाणार हे आता समोर आलं आहे. कारण याच सभेत बोलताना अजित पवार यांनी त्याबाबत वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, 'तुमच्या पाहुण्या-रावळ्यांना सांगा... बारामतीत घड्याळ चालवा. पिंपरी आणि चिंचवडमध्ये धनुष्यबाण बटन दाबा... इथं (शिरुर) घड्याळ आणि पुण्यात कमळ चिन्ह दाबायला सांगा.'

ADVERTISEMENT

मोदींना मत म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ...

'भोसरी, खडकवासला आणि हडपसरमध्ये आपल्याला पटवून द्यावं लागेल.  घड्याळ हे मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. मोदी साहेबांना मत म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ.. हे ठणकावून सांगावं लागेल.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले

'याच्यासारखा नालायक माणूस नाही..', श्रीनिवास पवारांनी केलेली अजितदादांवर जहरी टीका.. 

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जहरी टीका केली होती. जी अजित पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावेळी श्रीनिवास पवार म्हणाले होते की, 'तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगला काळ असेल, वाईट काळ असू दे, नेहमी दादांच्या (अजित पवार)बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.'

हे ही वाचा>> बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण?

'जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पदे मिळाली, ती साहेबांमुळे (शरद पवार) मिळाली. साहेबांना कीर्तन करा, घरी बसा म्हटलेलं मला काही पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत, त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही.'

'वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही.' अशा शब्दात श्रीनिवास पाटलांनी अजित पवारांना सुनावलं होतं. आता त्यांच्या याच टीकेला अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT