Vijay Shivtare: 'हा नालायक, उर्मट... त्यांचा भाऊही म्हणाला..' अजित पवारांवर शिवतारेंची जहरी टीका
Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'हा नालायक आहे, उर्मट आहे.. त्यांचे स्वत:चे बंधू सुद्धा आज तेच बोलले.. ही जगजाहीर आहे ना गोष्ट..' अशी जहरी टीका विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवारांवर जहरी टीका
अजित पवारांविरोधात विजय शिवतारे
बारामतीतून विजय शिवतारे राहणार उभे
Vijay Shivtare Criticized Ajit Pawar: मुंबई: शिवसेना (शिंदे गट) यांचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर अद्यापही ठाम आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अजित पवारांविरोधात आपला मोर्चा उघडला आहे. त्यातच आज (18 मार्च) पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्या भेटीनंतर शिवतारेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जहरी शब्दात टीका केली आहे. (ajit pawar is worthless man today his brother also said shiv sena leader vijay shivtare venomous criticism lok sabha election 2024 baramati)
ADVERTISEMENT
'जे मी बोललो की, हा नालायक आहे, उर्मट आहे.. त्यांचे स्वत:चे बंधू सुद्धा आज तेच बोलले.. ही जगजाहीर आहे ना गोष्ट..' असं म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
CM शिंदेंच्या भेटीनंतरही विजय शिवतारे आक्रमक, पार्थ पवारांच्या पराभवावरूनही अजितदादांना डिवचलं!
'आपल्याला आठवत असेल.. अजित पवार मला म्हणाले होते. तुझा आवाका किती, तू बोलतोयेस कोणाबद्दल... तू करतोयस काय.. तुला बघतोच..'
हे वाचलं का?
'त्याला माझा आवाका किती हे आता माहीत पडेल ना. धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना.. का मी सगळीकडे उमेदवार उभे करीन आणि काय करेन ते.. या धमक्या का देतोय अजित पवार?'
'माझा आवाका किती.. हे अजित पवार बोलले होते. अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं आहे. आता माझा आवाका काहीच नाही. मी छोटा माणूस आहे.. एवढा घाबरतो कशाला? महाराष्ट्राच्या जनतेसमोर अजितदादा बोलले होते. मला देखील महाराष्ट्रासमोरच बोलावं लागेल. त्यांनी माझा आवाका काढला होता. 'तुझी लायकी किती..' असं म्हणाले होते..'
ADVERTISEMENT
'एवढी घमंड होती ना.. आता एवढा तडफडतोय कशासाठी? इकडे बोला, तिकडे बोला.. मी दंड थोपटलं ते राजकीय नाही.. तर मी दंड थोपटले आहे ते राजकीय अपप्रवृत्ती संपविण्यासाठी.. माझं वैयक्तिक काही नाही..'
ADVERTISEMENT
'तुम्ही बारामतीकरांना पण फसवलंय आणि इतर पाच मतदारसंघांना पण फसवलंय. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलीए. पण आवाज कोण उठवणार? आवाज उठवणारा एक माणूस विजय शिवतारेच्या रुपाने मिळाला आहे.'
'मी भाईंच्या शब्दाच्या पुढे नाही.. कारण आमचा नेता.. खूप खालून आलेला नेता आहे.. पण त्यासोबत मी हे देखील सांगतो आहे पुन्हा-पुन्हा की, अपप्रवृत्ती संपविण्याचा नामी योग आला आहे. धमक्या का देत आहेत अजित पवार?'
'त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे.. पोस्टर लावतील, बॅनर लावतील.. पैसे उधळतील.. काय केलं होतं त्यांनी मावळमध्ये? 2 लाख मतांनी पडले ना तिथे पार्थ पवार.. जे मी बोललो की, हा नालायक आहे, उर्मट आहे.. त्यांचे स्वत:चे बंधू सुद्धा आज तेच बोलले.. ही जगजाहीर आहे ना गोष्ट..'
'एवढं जर त्यांना वाटत होतं तर अजित पवारांनी एक फोन मला करायला हवा होता ना.. त्याची गुर्मी अजूनही तशीच आहे.. एखादा फोन तरी करायला हवा होता.. ही गुर्मी आहे.. यांनी सगळ्यांना फसवलंय, सगळ्या बँका यांनी ताब्यात घेतल्या. एक कारखाना अजित पवारांनी उभारला नाही. 11 कारखाने कवडीमोल भावाने यांनी लिलावात राज्य सरकारकडून घेतले.' असे अत्यंत गंभीर आरोप विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केले आहेत.
दरम्यान, आता विजय शिवतारे यांच्या या टीकेनंतर अजित पवार हे नेमकं कसं उत्तर देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT