बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहेत श्रीनिवास पवार?

point

भाऊ की काका... श्रीनिवास पवारांचा कोणाला पाठिंबा?

point

श्रीनिवास पवार 'अजित पवारां'बद्दल नेमकं काय म्हणाले?

Shrinivas Pawar on Ajit Pawar : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok sabha Election 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. 4 जूनला मतमोजणी होईल. यासर्वात महाराष्ट्रात बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापले आहे. बारामती मतरदारसंघावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यात  जुंपली आहे. (Maharashtra Politics Baramati Who is Shrinivas Pawar Who is against Ajit Pawar and support Sharad Pawar

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून (NCP) बारामतीची जागा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढणार आहेत असं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत. या सर्वात संपूर्ण पवार घराणं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उतरले आहे. यासर्वात सध्या जोरदार चर्चेत आहेत ते म्हणजे श्रीनिवास पवार. ते कोण आहेत? त्यांचा अजित दादा आणि पवार घराण्याशी काय संबंध आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक (Buisness Man) असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत. त्यांचा शरयू ग्रुप अनेक कंपन्या चालवते. यात कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरूवात ऑटोमोबाइल डीलर म्हणून केली होती. यानंतर पुढे त्यांना यश मिळत गेलं आणि वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाइल डीलर्सपैकी एक म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. 

हे वाचलं का?

 

भाऊ की काका... श्रीनिवास पवारांचा कोणाला पाठिंबा?

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अजित पवार मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा सल्ला घेतात असंही सांगितलं जातं. दोघं भावंडांमधलं नातं जिव्हाळ्याचं आहे. पण, सध्याचं राजकारण आणि राष्ट्रवादीत पडलेली फुट यामुळे श्रीनिवास पवार सख्ख्या भावाच्या मतांशी सहमत नाही हे स्पष्ट दिसत आहे. 

ADVERTISEMENT

श्रीनिवास पवार राजकीय वर्तुळातून बाहेर आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी फार लोकांना माहिती नाही आहे. पण ते सण किंवा लग्न संमारंभासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा दिसतात. 
 

ADVERTISEMENT

श्रीनिवास पवार 'अजित पवारां'बद्दल नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये देखील संघर्ष होत आहे. यार्वात श्रीनिवास पवार यांनी धाकट्या भावाला (अजित पवार) फटकारलं आहे. त्यांनी भावाला पाठींबा न देता काका शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

काटेवाडीत बोलत असताना श्रीनिवास पवार म्हणाले की, 'मी आजवर अजित पवारांसोबत होतो. मी नेहमी त्यांना साथ दिली. आमच्यावर शरद पवार साहेबांचे खूप उपकार आहे. जे काही पदे मिळाली ते शरद पवार साहेबांमुळेच मिळाली. त्यांचे वय  देखील आता 83 आहे. अशावेळी शरद पवार साहेबांची साथ सोडणं मला अजिबात पटलं नाही. मी चांगल्या वाईट काळात अजित पवारांना साथ दिली आम्ही चर्चा केली. 
 
स्वार्थासाठी जो घरातल्या वयस्कर माणसाची किंमत करत नाही, त्याच्यासारखा नालायक माणूस नाही. अशी टीका त्यांनी केली. भाजपला शरद पवार हे नाव संपवायचं होतं, त्यामुळे त्यांनी अजित पवारांना फोडलं. शेत आपल्या नावावर केलं म्हणून आई-वडिलांना घराबाहेर काढायचं नसतं, साहेबांमुळे आतापर्यंत अनेक पदे मिळाली, त्यांच्यावर टीका करणं मला पटणारं नाही.' असंही यावेळी श्रीनिवास पवार म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT