NCP खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, चर्चांना उधाण

मुंबई तक

• 01:43 PM • 20 Jan 2022

शिवसेनेला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला Why I Killed Gandhi हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नथुराम गोडसेच्या उद्दातीकरणाला असलेला विरोध आणि भूमिका लक्षात घेता अमोल कोल्हेंनी केलेल्या भूमिकेवर […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला Why I Killed Gandhi हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नथुराम गोडसेच्या उद्दातीकरणाला असलेला विरोध आणि भूमिका लक्षात घेता अमोल कोल्हेंनी केलेल्या भूमिकेवर राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

या सर्व चर्चा सुरु असताना अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलवर याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं गरजेचं असल्याचं म्हणत अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून काम करताना काही भूमिका या आपल्या विचारधारेशी सहमत नसल्या तरीही आव्हानात्मक असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कलाकृतीकडे मनमोकळेपणाने पहावं अशी अपेक्षा अमोल कोल्हेंनी व्यक्त केली आहे.

जाणून घ्या काय म्हणाले आहेत अमोल कोल्हे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये?

२०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!

याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या या प्रकरणावर सावध भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, Why I Killed Gandhi हा ४५ मिनीटांचा एक चित्रपट आहे. अमोल कोल्हेची ओळख ही चांगला अभिनेता गुणी कलावंत अशी आहे. त्यांनी नथुराम गोडसेचा रोल केला असला तरी त्याकडे एक कलावंत म्हणून पाहावं असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

    follow whatsapp