Omicron : महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण, एकूण संख्या 108

मुंबई तक

• 04:18 PM • 24 Dec 2021

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण आढळले आहेत. यातले 14 रूग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. तर सहा रूग्णांचे अहवाल विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी दिले आहेत. Omicron Variant: ‘पुढील महिना सर्वात धोकादायक’, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा आज आढळलेले नवे 20 रूग्ण कुठे कुठे आहेत? पुणे-6 मुंबई-11 सातारा-2 अहमदनगर-1 यामुळे […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण आढळले आहेत. यातले 14 रूग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. तर सहा रूग्णांचे अहवाल विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

Omicron Variant: ‘पुढील महिना सर्वात धोकादायक’, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा

आज आढळलेले नवे 20 रूग्ण कुठे कुठे आहेत?

पुणे-6

मुंबई-11

सातारा-2

अहमदनगर-1

यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 108 एवढी झाली आहे.

हे 108 रूग्ण महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत ते जाणून घ्या.

मुंबई – 46

पिंपरी- 19

पुणे ग्रामीण- 15

पुणे मनपा-7

सातारा-5

उस्माबाद-5

कल्याण डोंबिवली-2

नागपूर-2

बुलढाणा-1

लातूर-1

वसई-विरार-1

नवी मुंबई- 1

ठाणे-1

मीरा भाईंदर-1

अहमदनगर-1

एकूण – 108

यातील दोन रूग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी एक रूग्ण छत्तीसगढ, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहेत. यापैकी 54 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

Omicron पाठ सोडत नाही… त्यातच आता नवा व्हेरिएंट DELMICRON ही आला?

आज आढळलेल्या 20 रूग्णांची माहिती

आज रिपोर्ट झालेल्या 20 रूग्णांपैकी 15 हे आंतररष्ट्रीय प्रवासी, 1 आंतरदेशीय प्रवासी तर 4 जण त्यांचे निकटसहवासित आहेत.

यातील 1 जण ही 18 वर्षाखालील बालक आहे तर 6 जण 60 वर्षांवरील आहेत.

आजाराचे स्वरूप : सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत

लसीकरण : 12 रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, 7 रुग्णांचे लसीकरण झाले नाही, तर 1 रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 722 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 157 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये काय लक्षणं दिसतात?

देशातील कोरोना रूग्णांबाबत आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलं आहे?

देशातल्या 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. भारतात एकूण 358 रूग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. यापैकी 117 रूग्ण बरे झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. इतर रूग्णांवर उपचार सुरू आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या 183 रूग्णांच्या केसचं अॅनालिसीस करण्यात आलं आहे. 183 पैकी 87 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर या 87 जणांपैकी तिघांनी बूस्टर डोसही घेतला होता. यापैकी सात जण असे आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नव्हता. 121 जण विदेशातून परतले आहेत. तर 44 जण हे ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्यांच्या लोकांच्या संपर्कात आले होते त्यामुळे त्यांना या व्हेरिएंटची बाधा झाली.

    follow whatsapp