Omicron Variant : नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याची केंद्राची सूचना; राज्यांना अलर्ट

मुंबई तक

• 04:21 AM • 22 Dec 2021

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल, असा इशाराही दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवलं असून, महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लग्न समारंभासह गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा सल्ला केंद्राने दिला असून, त्यामुळे लग्न समारंभासह सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल, असा इशाराही दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवलं असून, महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लग्न समारंभासह गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा सल्ला केंद्राने दिला असून, त्यामुळे लग्न समारंभासह सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.

हे वाचलं का?

देशातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एकूण 220 रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.

Omicron : महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी 11 रूग्ण, एकूण संख्या 65

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा तीनपट अधिक असून, वॉररुम पुन्हा सुरू करण्यात याव्यात, असा सल्ला केंद्राने या पत्रामध्ये दिला आहे. त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित सर्वच परिस्थितीवर नजर ठेवून जिल्हास्तरावरही कडक आणि तत्काळ पावलं उचलण्यात यावीत, असं केंद्राने या पत्रामध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे राज्यांना हे पत्र पाठवलं आहे. चाचण्या वाढवून परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याबरोबरच रात्रीची संचारबंदी, गर्दी होणाऱ्या मोठ्या सभांवर बंदी, लग्न आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मर्यादीत लोकांना परवानगी आदी उपाययोजना करण्यात याव्यात, असं या पत्रात म्हटलं आहे.

Covid 19 : आज महाराष्ट्रात 825 नव्या रूग्णांचं निदान, 14 मृत्यूंची नोंद

जिल्हा स्तरावर कंटेनमेंट झोन तयार करावेत. कंटेनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्यात याव्यात. रुग्णसंख्येचा सातत्याने आढावा घेण्यात यावा. रुग्णालयातील सुविधा वाढवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. अशा पद्धतीने रणनिती आखल्यास राज्यांमधील इतर भागात संसर्गाला आळा घालता येईल आणि स्थानिक पातळीवरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असं केंद्राने या पत्रात म्हटलं आहे.

वॉर रुम, आपत्कालीन मदत केंद्र सुरू करण्यात यावीत. रुग्णसंख्येच्या कलाचा अभ्यास करण्यात यावा. रुग्णसंख्या कमी होत असली, तरी स्थानिक पातळीवर सक्रियपणे उपाययोजना करण्यात याव्यात आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेण्यात यावा, यामुळे संक्रमण कमी करण्यास मदत होईल, असं भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. याचबरोबर राज्यांनी रुग्णसंख्येचा कल बघून कठोर निर्णय घेण्याची गरज आहे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

    follow whatsapp