मराठवाडयातही ‘ओमिक्रॉन’चा प्रवेश! दुबईहून परतलेल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटव्ह

मुंबई तक

• 04:01 AM • 14 Dec 2021

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात भीती निर्माण केली असून, भारतातील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागूपूर पाठोपाठ मराठवाड्यातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. मराठवाड्यातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या हा पहिलाच रुग्ण आहे. हा रुग्ण लातुरात आढळून आला आहे. सदरील व्यक्ती औसा येथील आहे. जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरत असून, परदेशातून परतणाऱ्या व्यक्तीबद्दल केंद्रानं […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात भीती निर्माण केली असून, भारतातील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागूपूर पाठोपाठ मराठवाड्यातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. मराठवाड्यातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या हा पहिलाच रुग्ण आहे. हा रुग्ण लातुरात आढळून आला आहे. सदरील व्यक्ती औसा येथील आहे.

हे वाचलं का?

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरत असून, परदेशातून परतणाऱ्या व्यक्तीबद्दल केंद्रानं सतर्कता बाळगली आहे. या व्यक्तींची विमानतळावरच चाचणी केली जात आहे. लातुर जिल्ह्यात आजतागायत 94 पेक्षा अधिक नागरिक विविध देशातून जिल्ह्यातील विविध भागात परतले आहेत.

Omicron: कोरोना व्हेरिएंट शोधण्याची पद्धत काय आहे? समजून घ्या सोप्या भाषेत

आरोग्य विभागाच्या वतीने या प्रवाशांची RTPCR कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आजतागायत चाचणी केलेल्या नागरिकांपैकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. त्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला की नाही? याचं निदान करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिगसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या दोन रुग्णांपैकी दुबई येथून आलेला औसा येथील रुग्णाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.

Booster Dose: सीरमने कोरोनाच्या बूस्टरच्या ट्रायलसाठीचा डेटा केला सबमिट, पण SEC म्हणतं…

या रुग्णावर लातुर येथील पुरणमल लाहोटी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी दिली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केलं आहे.

Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 569 नवीन रूग्णांचं निदान, 5 मृत्यूंची नोंद

ब्रिटनमध्ये Omicron चा पहिला बळी

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. तर दुसरीकडे ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने पसरत असून, दोन ते तीन दिवसांनी याचा संसर्ग दुपटीने वाढत आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’

    follow whatsapp