Omicron variant symptoms: ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणाबाबत समोर आली नवी माहिती

मुंबई तक

• 02:16 AM • 18 Dec 2021

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते, हा व्हेरिएंट आतापर्यंत 77 देशांमध्ये पसरला आहे आणि कोरोनाच्या या व्हेरिएंटचा वेग इतर कोणत्याही स्ट्रेनपेक्षा जास्त आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे तब्बल 88,376 रुग्ण आढळून आले आहेत. तर अमेरिकेत 36 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत […]

Mumbaitak
follow google news

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते, हा व्हेरिएंट आतापर्यंत 77 देशांमध्ये पसरला आहे आणि कोरोनाच्या या व्हेरिएंटचा वेग इतर कोणत्याही स्ट्रेनपेक्षा जास्त आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे तब्बल 88,376 रुग्ण आढळून आले आहेत. तर अमेरिकेत 36 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत ओमिक्रॉनचा वेग पाहता त्याची लक्षणे जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून संसर्ग वेळेत पसरण्यापासून रोखता येईल.

हे वाचलं का?

Omicron चे सर्वात सामान्य लक्षण (Omicron symptoms) – जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनचे नेमकं वर्तन कसं आहे समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. आतापर्यंतचा डेटा असे दर्शवितो की कोरोना विषाणूचा हा प्रकार अधिक संसर्ग पसरवणारा आहे.

परंतु आत्तापर्यंतच्या आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी गंभीर आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या लक्षणांच्या तुलनेत ओमिक्रॉनव व्हेरिएंटची लक्षणेही सौम्य आहेत. पण, आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांमध्ये एक लक्षण सामान्य आहे आणि ते म्हणजे घसा खवखवणे.

दक्षिण आफ्रिकेच्या डिस्कव्हरी हेल्थचे सीईओ डॉ. रायन नॉच यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत सांगितले की, डॉक्टरांनी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांच्या लक्षणांमध्ये थोडा वेगळा पॅटर्न पाहिला आहे. या सर्वांमध्ये संसर्गाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे घसा खवखवणे. यानंतर नाक बंद होणे, कोरडा खोकला, स्नायू आणि पाठदुखी अशी लक्षणे आढळून आली. डॉक्टर म्हणाले की ही सर्व लक्षणे सौम्य आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की ओमिक्रॉनचा आरोग्याला धोका नाही.’

ब्रिटिश आरोग्य तज्ज्ञांनीही डॉ. नॉचशी सहमती दर्शवली आहे. सर जॉन बेल यांनी बीबीसी रेडिओ कार्यक्रमात सांगितले की, प्राथमिक डेटावरून असे दिसून येते की, ओमिक्रॉन मागील कोरोना व्हायरसपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने व्यवहार करत आहे.’

ते म्हणाले, ‘या विशिष्ट विषाणूची लक्षणे पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळी आहेत. चोंदलेले नाक, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि अतिसार ही लक्षणे आहेत ज्याकडे लक्ष दिले पाहिजे.’

‘ओमिक्रॉनचा संसर्ग भारतात झपाट्याने पसरेल’

दक्षिण आफ्रिकन DSI-NRF सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिडेमियोलॉजिकल मॉडेलिंग अँड अॅनालिसिस (SACEMA) चे संचालक ज्युलिएट पुलियम यांनी दावा केला आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतात वेगाने पसरत आहे. एका मुलाखतीत, पुलियम यांनी चिंता व्यक्त करताना असंही म्हटलं आहे की, भारतातील रुग्णालय नियोजनाशी संबंधित बाबींसाठी तयार राहणे एक शहाणपणाचे पाऊल असेल.

पुलियम म्हणाले की, ‘ओमिक्रॉन पूर्वी संसर्ग झालेल्या लोकांना देखील होत आहे. त्याचा संसर्ग दर मागील सर्व व्हेरिएंटपेक्षा खूप जास्त आहे. प्राथमिक डेटा सूचित करतो की, पूर्णपणे लसीकरण झालेले लोक देखील नवीन व्हेरिएंटपासून वाचू शकलेले नाहीत.’

Omicron: ब्रिटनमध्ये एका दिवसात कोरोनाचे 88 हजारांहून अधिक नवे रुग्ण; भारतातही Omicron रुग्णांमध्ये वाढ

‘ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती जी दक्षिण आफ्रिकेत पूर्वी दिसली होती, ती आता जगभरातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. भारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली होती. ज्यामुळे भारतातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती.’

‘ओमिक्रॉन संसर्गाच्या गंभीरतेबद्दल आम्हाला अजून फारशी माहिती नाही. मला वाटते की ज्यांना लसीकरण केले गेले आहे आणि ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसू शकतात. तथापि, खराब प्रतिकारशक्ती असलेल्यांवर त्याचा परिणाम मागील व्हेरिएंटसारखाच असू शकतो. त्यामुळे रुग्णालय नियोजनाच्या बाबतीत बिकट परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.’ असंही पुलियम यावेळी म्हणाले.

    follow whatsapp