चार दिवस मुसळधार पावसाचे, कोकण गोव्यासाठी IMD ने दिला Orange Alert

मुंबई तक

• 01:45 AM • 28 Jul 2021

कोकण आणि गोव्यासाठी 30 आणि 31 जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर पुढचे पाच दिवस हे पावसाचे असणार आहेत असंही सांगण्यात आलं आहे. कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली […]

Mumbaitak
follow google news

कोकण आणि गोव्यासाठी 30 आणि 31 जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर पुढचे पाच दिवस हे पावसाचे असणार आहेत असंही सांगण्यात आलं आहे. कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच कोकण आणि गोवा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पश्चिमेचे वारे वेगाने वाहतील, त्यामुळे कोकण आणि गोव्यात संततधार राहिल असं पुणे हवाम खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.

एवढंच नाही तर 28 जुलै ते 31 जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही 30, 31 जुलैला पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर आणि खासकरून सह्याद्रीच्या रांगा असलेल्या परिसरात 28 आणि 29 जुलै रोजी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तसंच अतिमुसळधार पाऊस हा 30 आणि 31 जुलैला होईल असाही इशारा देण्यात आला आहे.

48 तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसांचा जोर वाढणार असून, 29 आणि 30 जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

नैसर्गिक आपत्ती ही कोणत्याही क्षणी येऊ शकते, येणाऱ्या संकटासाठी लोकांनी तयार असावं म्हणून हा अलर्ट जारी करण्यात येतो. या कालावधीत वीज पुरवठा खंडीत होणं, वाहतूक ठप्प होणं घडू शकतं. पुढच्या संकटाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ऑरेंज अलर्ट देण्यात येतो. गरज असेल आणि अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं या अलर्टमध्ये सांगण्यात येतं.

रेड अलर्ट म्हणजे काय?

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

एवढंच नाही तर आयएमडीने म्हणजेच भारतीय हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाचे असतील असंही स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली. आता पुढचे चार दिवसही कोसळधार असणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागच्या आठवड्यात मुंबईसह राज्यभरात जो पाऊस पडला त्यामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं पाहण्यास मिळालं. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आताशा काहीसे पावसातून सावरत आहेत तोच पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार गेल्या आठवड्यात पाऊस पडला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, रायगड, महाड या सगळ्या ठिकाणी पावसाने कहर केला.

तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातार या ठिकाणीही कोसळधारच होती. भूस्खलन आणि दरड कोसळण्याचाही घटना राज्यात घडल्या. रायगड जिल्ह्यातील तळिये हे अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं आहे. या गावातल्या ८० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. आता येणारा पाऊस आणखी काय काय रौद्ररूप दाखवतो आणि किती हानी करतो हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp