विरोधी पक्ष दररोज सरकार पडण्याचा मुहूर्त देतोय अन्…; पंकजांचा भाजपला घरचा आहेर

मुंबई तक

• 11:40 AM • 15 Oct 2021

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा मुंडे यांनी सरकार आणि स्वपक्षीयांच्या विधानांवर परखड मत मांडलं. यावेळी राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत पुरेशी नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही’, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. दसरा […]

Mumbaitak
follow google news

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा मुंडे यांनी सरकार आणि स्वपक्षीयांच्या विधानांवर परखड मत मांडलं. यावेळी राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत पुरेशी नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही’, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

हे वाचलं का?

दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा म्हणाल्या, ‘मी माझ्याही पक्षाला सांगणार आहे. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता उठतो आणि सांगतो हे सरकार पडणार आहे. म्हणतो की नाही? या तारखेला पडणार आहे, त्या तारखेला पडणार आहे. दुसरीकडे प्रत्येक सत्ताधारी म्हणतो आमचं सरकार खंबीर आहे. सरकार पडणार आहे की नाही; याच्यातून तुम्ही बाहेर येणार आहात की नाही? विरोधी पक्ष दररोज सरकार पडण्याचा मुहूर्त देतोय आणि सत्ताधारी म्हणतात सरकार मजबूत आहे’, असा टोला पंकजा मुंडे यांनी स्वपक्षातील नेत्यांना लगावला.

‘सरकार पडणार आणि सरकार मजबूत असणं, आमचं ध्येय नाही. जनतेसाठी काय करताय यावर बोला. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणण्यासाठी तत्कालिन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं, तेव्हा सत्ता परिवर्तन झालं. आता आपण आपापल्या भूमिकेत जावं. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्याच्या भूमिकेत… देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या हितावर लक्ष केंद्रीत करावं’, असं पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या.

‘तुम मुझे कब तक रोकोगे?’.. म्हणत पंकजा मुंडे यांचं आक्रमक भाषण

आगामी काळातील दौरा केला जाहीर

भगवान गडावरील मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी आगामी काळातील दौरा जाहीर केला. ‘मी काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण माझ्या आयुष्यात मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवान बाबांची मूर्ती आहे. या पवित्र स्थानावर उच्चार करायचा नाही, अशा कोणत्याशी शब्दाचा मी उच्चार करणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीवर बोलून सुद्धा भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख मला करायचा नाही. आणि अशा कुठल्याही प्रवृत्तीचा मला उल्लेख करायचा नाही.’

‘काही लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले आहे. ते लोक आज खुश असतील, पण माझा दौरा लिहून घ्या. मी आता 17 ते 20 तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी 23 ते 25 मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर 12 डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावांगावात संवाद साधणार आहे’, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत येण्याचं आवाहन केलं.

    follow whatsapp