परमबीर सिंग यांनी सुप्रिम कोर्टाकडे केली बदली रोखण्याची मागणी

मुंबई तक

• 01:15 PM • 22 Mar 2021

मुंबई तक : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सींग यांनी सुप्रिम कोर्टात सोमवारी एक याचिका दखल केली. ज्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केलीय. त्याचबरोबर परमबीर सिंग यांची होमा गार्डच्या महासंचालकपदी झालेली बदली रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी करताना परमबीर सिंग यांनी त्यांच्या पिटिशनमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ज्यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तक : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सींग यांनी सुप्रिम कोर्टात सोमवारी एक याचिका दखल केली. ज्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केलीय. त्याचबरोबर परमबीर सिंग यांची होमा गार्डच्या महासंचालकपदी झालेली बदली रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ही मागणी करताना परमबीर सिंग यांनी त्यांच्या पिटिशनमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ज्यात ते म्हणाले आहेत की किमान सेवा कालावधी पूर्ण केल्याशिवायच त्यांची बदली करण्यात आली आहे जी नियमबाह्य आहे. किमान सेवा कालावधी हा 2 वर्षांचा असून तो पूर्ण होण्याआधीच झालेली बदली असल्याने ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर ही बदली महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चं उल्लंघन आहे. त्याचबरोबर अशा त-हेने केलेल्या बदलीमुळे संविधानाच्या आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 च उल्लंघन झाल्याचंही त्यंनी यावेळी नमूद केलंय.

परमबीर यांची 17 मार्च रोजी बदली करण्यात आली. त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरुन हटवून त्या जागी हेमंत नगराळे यांच्या बदली त्यांच्या जागेवर करण्यात आली.

याच पिटीशनमध्ये परमबिर यांनी त्यांनी केलेले आरोप हे खरे त्यामध्ये तथ्य असल्याचं सागिंतलं आहे. त्यांनी या याचिकेत म्हटलंय “मी काहीही खोटं बोललेलो नाही असंही त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सचिन वाझे त्यांना किती वेळा भेटले ते समोर येईल असंही परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.” आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जर सीबीआय चौकशीचे आदेश दिले तर राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp