Petrol-Diesel Price Today 02 November 2021: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारचे (2 नोव्हेंबर) पेट्रोल ( Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले आहेत. ऐन दिवाळीत देखील पेट्रोलचे दर हे पुन्हा वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांना कोणताही दिलासा सरकारकडून देण्यात आलेला नाही.
ADVERTISEMENT
तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या ताज्या अपडेटनुसार पेट्रोलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल आज (मंगळवार) 35 पैशांनी महागलं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी देखील पेट्रोलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे एका गोष्ट दिलासा देणारी ठरली आहे. ती म्हणजे डिझेलच्या दरात आज कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून डिझेलचे दर हे स्थिर आहेत.
देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 110.04 रुपये प्रति लिटर झाला आहे.
ही सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झालेली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 115.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर झाली आहे.
काही राज्यातील पेट्रोलचे दर
-
मुंबई – 115.85
-
दिल्ली – 110.04
-
कोलकाता – 110.49
-
चेन्नई – 106.66
काही राज्यातील डिझेलचे दर
-
मुंबई – 106.52
-
दिल्ली – 98.42
-
कोलकाता – 101.56
-
चेन्नई – 102.59
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने विक्रमी दरवाढ होत आहे. पण असं असताना देखील तेल कंपन्यांकडून दर कमी करण्याचे कोणतंही प्रयत्न केले जात नाही. तर त्याउलट दिवसेंदिवस दर वाढवलेच जात आहेत. मागील सात दिवस सलग पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत सलग सहा दिवस दरवाढ झाली आहे.
देशात केंद्र आणि राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या एक्साइज ड्यूटीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मागील सात दिवसात सलग दरवाढ झाली असून 2.45 रुपयांनी पेट्रोल महागलं आहे. तर डिझेल 2 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.
महागाईत भर.. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता कडाडले भाज्यांचे दर..
परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करत असतात.
तुम्ही तुमच्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईल (IOCL) च्या ग्राहकांना फक्त RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
ADVERTISEMENT











