Mann Ki Baat: कोरोना काळात ऑक्सिजन कुठून आणि कसं आणलं, स्वत: पंतप्रधान मोदींनी सांगितलं!

मुंबई तक

• 06:48 AM • 30 May 2021

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 मे) त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. हा मन की बात कार्यक्रमाचा 77वा भाग होता. यावेळी त्यांनी योगायोग म्हणजे मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्याविषयी बोलताना ते असं म्हणाले की, आम्ही आतापर्यंत टीम इंडिया म्हणून काम केलं आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 मे) त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. हा मन की बात कार्यक्रमाचा 77वा भाग होता. यावेळी त्यांनी योगायोग म्हणजे मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्याविषयी बोलताना ते असं म्हणाले की, आम्ही आतापर्यंत टीम इंडिया म्हणून काम केलं आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रामुख्याने देशातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भाष्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा असताना कशा पद्धतीने जगभरातून ऑक्सिजन मिळविण्यात आला याबाबत त्यांनी माहिती दिली. तसंच यावेळी ऑक्सिजन पुरवठ्या करणाऱ्या काही लोकांशी देखील संवाद साधाला.

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘या संकटाच्या वेळी डॉक्टर आणि परिचारिकांनी आपली चिंता बाजूला सारून लोकांना मदत केली आहे.’ यावेळी पीएम मोदी यांनी ऑक्सिजन टँकरच्या पुरवठ्यात सामील असलेल्या जल, भूमी आणि हवाई दलाचे कौतुक केले. पीएम मोदी म्हणाले की, ‘सैन्याचे जवान सध्या जे काम करत आहेत ते त्यांचे नित्याचे काम नाही. अशा प्रकारची आपत्ती जवळजवळ 100 वर्षांनंतर आली आहे. मी या सर्वांना सलाम करतो.’

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यक्रमादरम्यान जौनपूरचे दिनेश उपाध्याय यांच्याशी संवाद साधला. दिनेश उपाध्याय ऑक्सिजन टँकर चालवतात. संकटाच्या वेळी लोकांना मदत करणारे दिनेश उपाध्याय यांनी आपले अनुभव पंतप्रधान मोदींना सांगितले. पीएम मोदी म्हणाले की, ‘आम्ही ही लढाई जिंकू कारण दिनेश उपाध्याय यांच्यासारखे लाखो लोक या लढाईत गुंतले आहेत.’

…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात आले अश्रू

यानंतर पीएम मोदी यांनी ऑक्सिजन एक्सप्रेसच्या लोको पायलट शिरीषा यांच्याशी संवाद साधला. शिरीषाने पंतप्रधान मोदींना सांगितले की, ती तिच्या वडिलांकडून प्रेरणा घेते. पीएम मोदी म्हणाले की, ‘ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. कोरोनामुळे, आमच्या माता-भगिनीही वाईट परिस्थितीत ही लढाई लढत आहेत.’ यानंतर पंतप्रधान मोदींनी एअरफोर्समध्ये कार्यरत ग्रुप कॅप्टन ए के पटनायक यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदींनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी ए के पटनायक यांची मुलगी आदितीशी देखील संवाद साधला.

‘मन की बात’ या मासिक रेडिओ प्रोग्रामचा हा 77 वा भाग होता. तर ‘मन की बात 2.0’ चा हा 24 वा भाग होता. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी 25 एप्रिल रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. पीएम मोदी यावेळी डॉक्टरांशी बोलले होते आणि लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता.

Twitter आणि मोदी सरकार यांच्यातला वाद काय आहे? भारतात Twitter बंद होणार?

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीय यांनी तौकताई आणि यास वादळामुळे ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना देखील व्यक्त केली.

    follow whatsapp