सातारा जिल्हा बँक निवडणूक : सरकारमधले दोन मंत्री लढत आहेत अस्तित्वाची लढाई

इम्तियाज मुजावर

• 01:59 PM • 19 Nov 2021

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही राजे बिनविरोध निवडून आलेले असले तरीही सरकारमधील दोन विद्यमान मंत्र्यांना प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पॅनेलमध्ये डावलले गेले त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर यांना संधी देण्यात आली त्यामुळे गृह राज्य मंत्र्यांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीपासूनच सत्ताधारी […]

Mumbaitak
follow google news

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही राजे बिनविरोध निवडून आलेले असले तरीही सरकारमधील दोन विद्यमान मंत्र्यांना प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पॅनेलमध्ये डावलले गेले त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर यांना संधी देण्यात आली त्यामुळे गृह राज्य मंत्र्यांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.

हे वाचलं का?

सुरूवातीपासूनच सत्ताधारी पॅनमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उमेदवारीची मागणी केली होती मात्र राष्ट्रवादीच्या हायकमांड वरून आदेश नंतर गृहराज्यमंत्री देसाई यांना रेड सिग्नल देण्यात आला. दुसरीकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही निवडणुकीत आपलं नशिब आजमावं लागणार आहे.

सातारा जिल्हा बँक सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाटण सोसायटी मतदार संघातील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सहकारातील निवडणुकीकडे सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत. वातावरणात आता विधानसभेच्या रणसंग्रामाप्रमाणे तापले आहे . एकूण 102 पैकी 52 मते मिळवणारा उमेदवार विजयी होईल.स्वाभाविकच या 52 मतदारांच्या मतदानावर तालुक्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान

सातारा जिल्हा बँक जिल्हा बँकेत अनेक वर्षांपासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा कायमच वरचष्मा राहिला आहे. स्वतःसह त्यांनी निष्ठावंत असलेल्या स्व. तात्यासाहेब दिवशीकर, एल.एम.पवार, सौ. मंगल पवार, सौ. देशमुख आदींना जिल्हा बँकेत संधी दिली होती. अगदी ना. देसाई यांचे पिताश्री स्व. शिवाजीराव देसाई यांचाही स्व.तात्यासाहेब दिवशीकर यांचेकडून पराभव करण्यात पाटणकरांना यश आले होते. गेल्या अनेक वर्षांत देसाई गटाकडून स्वतःच्या घराण्यातील उमेदवार न देता पाटणकरांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये काही वेळा पाटणकर बिनविरोध गेले तर काही वेळा केवळ तांत्रिक कुस्त्या झाल्या. यावेळची निवडणूक ही राजकीय प्रतिष्ठा व अस्तित्वाची ठरणार आहे. स्वतः देसाई हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

राज्यासह जिल्ह्यातील त्यांचा राजकीय दबदबा, प्रतिष्ठा व आगामी काळातील राजकारणावर यातील जय-पराजयाचे परिणाम दिसून येतील. ना. देसाई यांनी अतिशय आत्मविश्वासाने उमेदवारी केलीय यात शंकाच नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावेच लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

    follow whatsapp