राज्याचा Recovery Rate ९३ टक्क्यांवर, आजही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक

मुंबई तक

• 02:59 PM • 29 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला आहे. आज राज्यात २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला आहे. आज राज्यात २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हे वाचलं का?

वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. याचा फायदा रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यामध्ये होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के इतका आहे. आज ४४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ही संख्या अजून कमी करण्यासाठी राज्य सरकारला अधिक प्रयत्न करावे लागणार असं दिसंतय.

ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे तिकडे राज्य सरकार निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. परंतू रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये यापुढे अधिक लक्ष दिलं जाणार असून या भागांत होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दुसरीकडे मुंबईतही आज १ हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून १ हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आज २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या लसीकरणाबाबत सध्या बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे लसींचा तुटवडा होत असताना दुसरीकडे इतरही अनेक अडचणी समोर येत आहेत. यातील एक समस्या अशी आहे की, लसीच्या पहिल्या डोससाठी कोविनवर आपण अपॉईटमेंट स्लॉट बुक केला पण काही कारणास्तव आपल्याला डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाता आलं नाही तर आपली नोंदणी रद्द होत असल्याचं समोर आलं आहे. अशावेळी नेमकं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता याबाबत सरकारने एक नवा नियम लागू केला आहे.

जर काही कारणास्तव आपला पहिला डोस घेणं राहून गेलं तरी आपण आता नव्याने लसीकरणासाठी नोंदणी करुन पुन्हा पहिला डोस घेऊ शकता. तशी तरतूद आता कोविनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस घेणं राहून गेलं असेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्यांना पहिल्या डोससाठी नव्याने नोंदणी करावी लागेल.

CoWIN पोर्टल कसं करावं रजिस्ट्रेशन?

  • सगळ्यात आधी https://selfregistration.cowin.gov.in/ ओपन करा आणि इथे मोबाइल नंबर टाकून Get OTP वर क्लिक करा.

  • OTP प्राप्त झाल्यानंतर तो वेबसाइटवर भरा आणि ‘Verify’ वर क्लिक करा आणि ‘Register for Vaccination’ पेज वर आपलं फोटो ID प्रूफ, नाव, लिंग आणि जन्मतारीख ही सर्व माहिती भरा.

  • यानंतर आपल्याला अपॉईटमेंट शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. आपण ज्या व्यक्तीसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या बाजूला ‘Schedule’बटणवर क्लिक करा.

  • यानंतर आपला पिन कोड टाका आणि Search वर क्लिक करा. यानंतर आपल्याला या पिन कोडशी निगडीत सेंटर दिसू लागतील.

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेंटर, तारीख आणि वेळ यांची निवड करुन ‘Confirm’ वर क्लिक करायचं आहे. एक यूजर हा चार सदस्यांसाठी व्हॅक्सिनेशन बुक करु शकतो.

    follow whatsapp